स्वयंम न्यज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी मोफत पॅन कार्ड नोंदणी तसेच दुरुस्ती शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन शिवसेना उपनेते तथा झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नहाटा यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने उपस्थित होते.उपविभाग प्रमुख राजेंद्र मोकल , शाखाप्रमुख गणेश कांबळे, शाखा प्रमुख जितेंद्र कोंडस्कर, कार्यालय प्रमुख प्रकाश राणे, मुबीन काझी, विद्याधर महाडेश्वर, सुरेश माळवे, दत्ता साबळे व महा ई सेवा केंद्र चालक संदीप रोकडे यांच्या सहकार्याने 29 जुलै पर्यंत पॅन कार्ड शिबीर सुरू राहणार आहे. नवीन कार्ड नोंदणी, पॅन कार्ड हरवले असल्यास व काही दुरुस्ती असल्यास ती या शिबिरात विनामुल्य केली जाईल. सिवूडसमधील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी केले आहे.