नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ मधील श्री सागर दर्शन सोसायटीतील सी-१९, ०:२ येथील गोरक्षनाथ गेनभाऊ गांडाळ यांच्या घरातील ही गणेशमूर्ती. या गणेशमूर्तीची आरास करताना देव सर्वत्र आहे, याचा देखावा मांडण्यात आला आहे. १. रेड्या मुखी वेद, २. हिरण्य कश्यपचा वध, ३. पंढरीची वारी, ४. गजर विठुनामाचा याचे सादरीकरण करण्यात आले आहे.