राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
उरण : शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उरण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून मा. आमदार विवेक पाटील यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी जासई येथील हुतात्मा स्मारक तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मारकास वंदन करून हजारो कार्यकर्त्यांसह खटारावर स्वार होत आमदार विवेक पाटील अर्ज दाखल करण्याकरता पोहोचले.
यावेळी बोलताना मा. आमदार विवेक पाटील म्हणाले की, इतक्या उन्हात ही जे कार्यकर्ते कशाचीही पर्वा न करता माझ्यासोबत उभे आहेत याच मेहनती कार्यकर्त्यांच्या जीवावर मी ही निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही. मग कोणी कितीही पैसे वाटो परंतु माझा शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा बहाद्दर कार्यकर्ता त्याकडे ढुंकून ही पाहणार नाही. मला निवडणूक जिंकायची आहे परंतु ती माझ्यासाठी नव्हे. मी याआधीही तीन वेळा आमदार होतो परंतु मला पुन्हा आमदार व्हायचं आहे ते माझ्यासाठी नव्हे तर माझ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीचं.
गेल्या पाच वर्षात उरण विधानसभा मतदारसंघातल्या समस्या डोंगराएवढ्या मोठ्या झाल्या आहेत येथील वाहतुकीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न जटिल होऊन बसला आहे. सातत्याने होणारे अपघात यामुळे तरुणांचा मोठा प्रमाणात बळी जात आहे. स्थानिकांना बेरोजगार व्हावे लागत आहे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपण मला निवडून द्याल याची मला खात्री आहे.
याप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेलचे माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, शेकाप उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील, साई मंदिर वाहाळ चे संस्थापक तसेच कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष रवीशेठ पाटील, ज्येष्ठ नेते काका पाटील, प्रा. एल .बी. पाटील, कामगार नेते रवी घरत , जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष पाटील, मनोहरशेठ पाटील, जीवन गावंड, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, महादेव बंडा, अमित घरत, रमाकांत म्हात्रे, मयूर सुतार, सुरेश पाटील, दीपक मढवी, जिप सदस्य सागर कडू, शुभांगी पाटील, माजी सरपंच धनाजी ठाकूर, शरद ठाकूर, सीताराम नाखवा, माया पाटील, नाहिदा ठाकूर, सीमा घरत, हेमंत पाटील, पी वाय कडू, ना का ठाकूर गुरुजी आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .
चौकट
साहेबांसोबत सेल्फीची कार्यकर्त्यांना क्रेझ !
आज मा. आमदार विवेक पाटील यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेले प्रचंड आकर्षण दिसून आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली आणि त्यानंतर सुरू झाले कार्यकर्त्यांचे साहेबांसोबतचे फोटोसेशन आणि सेल्फी काढण्याची लगबग तब्बल अर्धा तास शेकडो कार्यकर्त्यांनी साहेबांकडे सेल्फीचा आग्रह धरला आणि साहेबांनी देखील दिलखुलासपणे सर्वांसोबत सेल्फी काढले.