राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
पनवेल : कांतीलाल कडू यांची छाती म्हणजे विरोधकांच्या कट्यारीला आव्हान असल्याचे आज पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले. १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज आपल्या शेकडो प्रामाणिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता नवले यांच्याकडे दाखल केला. त्यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अमित सानप आणि संजय शिंदे उपस्थित होते.
पनवेल विधानसभा मतदार संघात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरोधात उमेदवार सापडत नसल्याची कोल्हेकुई आ. प्रशांत ठाकूर समर्थकांनी सोशल मीडियावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू केली होती. राजकीय किंवा मान्यताप्राप्त पक्षाची उमेदवारी घेवून कुणीही लढतो. परंतु राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षाविरोधी छातीचा कोट करून लढण्यासाठी कांतीलाल कडू पुढे सरसावले आहेत. त्यांनी आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह अतिशय शांततेत पनवेल विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपा, शेतकरी कामगार पक्षासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
कांतीलाल कडू गेल्या पंचवीसहून अधिक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. ते नावाजलेले संपादक, साहित्यिक तसेच उत्कृष्ट वक्ते, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून लोकप्रिय आहेत.
पनवेल विधानसभा मतदार संघातील गावे, शहरे वाड्या, वस्ती व इतर परिसरातील नागरी सुविधा सोडवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांची अनेक आंदोलने गाजली असून भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ ठरलेले तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपाने उघडलेल्या हटाव मोहिमेला जबरदस्त दणका दिला होता. त्याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढून महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते.
पाणी आंदोलनातून त्यांनी सत्ताधारी भाजपा, आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका विरोधी पक्ष असलेला शेकाप यांच्याविरोधात आंदोलन केल्याने महिला वर्गाची चांगलीच पसंती मिळवली आहे. पाणी आंदोलन पेटवून प्रशासन आणि पाणी चोरांना लगाम घातला. त्यामुळे पाणी चोरांना टँकर बंद करावे लागले, हे टँकर कुणाचे आणि पाणी चोर कोण हे कडू यांनी पनवेलकरांना दाखवून दिले.
लेडीज बारविरोधी आंदोलन करून भाजपा आणि शेकापच्या बार चालकांना चांगलीच अद्दल घडवली. कडू यांच्या आंदोलनामुळे स्वैराचाराला आळा बसला आहे. राजकीय दहशत आणि साम्राज्यवादाविरोधात कडू यांचे सातत्यपूर्ण लिखाण लोकांची उत्सुकता वाढवणारे असल्याने त्यांची लोकप्रियता आणि जीवनशैली या निवडणुकीत करिष्मा करणारी ठरणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ . भक्तीकुमार दवे, कमळ नागरी सहकारी पत संस्थेचे सल्लागार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशिकांत बांदोडकर, कडू यांच्या पत्नी रूपा कडू आणि भगिनी मीनाक्षी मुंबईकर उपस्थित होत्या.
समर्थन देण्यासाठी आनंद पाटील, प्रिया पाटील, स्वप्निल म्हात्रे, सुरज म्हात्रे, सचिन पाटील, संतोष सुतार, धनंजय घाटेे, गौरव भगत, भावेश पाटील, मंगेश सूर्यवंशी, मंगल भारवाड, हर्षद म्हात्रे, अजित सिंग, ओमकार लाड, विवेक लाड, भूषण लाड, जयेश दुर्गे, चेतन भोपी, बाबा पठाण, रामश्री चौहान, प्रकाश पाटील, प्रकाश गायकवाड, दिपक भोपी, गुरुनाथ वाघमारे, भाऊ फडके, महेंद्र पाटील, राजन भगत, धाऊ भोपी, परशुराम सांगडे, पांडे, दत्ता केणी, अनंता फडके, भाऊ ठाकूर, सचिन पाटील, तुकाराम पाटील, बाळाराम शेळके, कार्तिक पाटील, केशव पाटील, महादू पाटील, शरद फडके, विनोद पाटील, यशवंत पाटील, दत्ता पाटील, सोमनाथ पाटील, अनंता पाटील, निलेश काकडे, रणजीत कोळखेकर, गजानन शेळके, लहू शेळके, मारूती शेळके, दिपक कांबळे, नितीन कांबळे, महेंद्र भगत, भगवान शेळके, प्रितम पाटील, योगेश फडके, गजानन ढोंगरे, अंकित भगत, प्रेम पाटील, वसंत माळी, आकाश माळी, संदेश ढोंगरे, पिंट्या माळी, विनोद पाटील, सागर फडके, बंटी फडके, संदेश फडके, जितेश पाटील, ज्ञानदेव कुंभारकर, ज्ञानदेव पाटील, अलंकार पाटील, विजय ढोंगरे, संजय यादव, शरद जगे, संजय चोरघे, अनंता भोपी, सुरेश ठोंबरे, शैलेश पांडव, बाळाराम पाटील, सुभाष सोनटक्के, मनोहर घरत, नवनाथ थळे, कुश गुप्ता, प्रकाश भोरकडे, विनोद कांबळे, प्रविण पाटील, मनोहर रोमन, देविदास पाटील, स्वप्निल मिठगावक, संजय शिंदे, दिनेश मिठगावक, उदय पानसकर, अरुण म्हात्रे, तेजस धादवट, कुशल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.