अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत गजानन काळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीची तुफानी रॅली
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या मुहूर्तावर अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १५१ बेलापूर मतदार संघातून मनसेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने विधानसभा २०१९ आमदार नामांकन अर्ज बेलापूर निवडणूक अधिकारी यांना सुपूर्द केला.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे कृतीशील स्वप्नं ज्यांनी पाहिले अशा राज ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा वारसा सांगणारा, लढवैय्या पण आधुनिक युगाशी नातं सांगणाऱ्या , सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या प्रसंगी तुरूंगात जाणाऱ्या प्रगल्भ युवा नेतृत्वाला गजानन काळे यांना बेलापूर मधुन उमेदवारी दिली आहे. त्यामळे बेलापुर मतदार संघात तरूणांमध्ये उत्साह पसरला आहे.
छात्रभारती या विद्यार्थी संघटनेतून ते चळवळीत गेले . छात्रभारतीच्या माध्यमातून मेलेल्या विद्यार्थी चळवळीला त्यांनी जिवंत करून चळवळीला उर्जीतावस्था आणली. विद्यार्थी चळवळीत त्यांनी मोठी कामगीरी केली व प्रस्थापीत शिक्षक सम्राटांना दणका दिला. कोणताही गाॅडफादर नसताना आपले राजकीय अस्तिव निर्माण केले. त्याच काळात मराठी भाषा, मराठी अस्मिता व मराठी माणूस यासाठी त्यांनी जे कार्य केले त्याने मराठी जगतात मोठा दरारा निर्माण झाला. विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून विद्यापीठ आणि मंत्रालयात गजानन काळे यांनी फोडलेल्या डरकाळी मुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय त्यांनी मिळवून दिलाच पण अनेक जुलमी शासन निर्णय,कायदे बदलण्यास भाग पाडले आणि त्यामुळेच प्रभावित होऊन स्वतः राज साहेबांनी गजाननला विद्यार्थी संघटनेच्या, महाराष्ट्र सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली व मिळालेल्या संधीचा उपयोग करून विद्यार्थी चळवळीला पुन्हा जबरदस्त ताकद दिली , त्यामुळे राजसाहेबांनी कौतूकाने गजानन काळे यांना मनसेच्या नवी मुंबई शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि तीचं त्यांनी किती सोनं केलं हे नवी मुंबईकरांना कोणी सांगण्याची गरज नाही…
सकाळी मतदार संघ परिसरात १५१ झाडे लावून निवडणुक प्रचाराचा वेगळ्या पद्धतीने शुभारंभ गजानन काळे यांनी केला… यावेळी नवी मुंबई परिसरात गजानन काळे यांच्या बरोबर नवी मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याच्या विभागात झाडे लावून प्रचाराला सुरुवात केली .. दुपारी १:३० वाजता अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवी बेलापूर मध्ये रॅली काढण्यात आली.रॅलीचा शेवट गजानन काळे यांचा नामांकण अर्ज दाखल करून करण्यात आला.
निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन
राजसाहेब ठाकरे यांच्या जडणघडणीत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सावलीप्रमाणे प्रभाव आहे. तेव्हा गजानन काळे यांच्या बाळासाहेबांच्या मुशीत लालबाग परळ मध्ये काम करणाऱ्या आणि कालांतराने नवी मुंबई बेलापूर मध्ये स्थलांतरित झालेल्या जेष्ठ शिवसैनिक श्रीकांत बिर्जे काका यांच्या हस्ते मनसे बेलापूर निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीकांत माने यांनी कळविले आहे.