सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजप-शिवसेना महायुतीचे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणेश नाईक दसऱ्याच्या शुभमूहूर्तावर बोनकोडे-खैराणे परिसरात प्रचाराची रॅली काढणार आहे.
सकाळी १० वाजता बोनकोडे गावातील विठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून या प्रचार रॅलीस सुरूवात होणार आहे. ही रॅली बोनकोडेतील पीरदेव, रामनगर बौध्द विहाराजवळ, खैरणे गांव, सेक्टर १२, कलश उद्यान, फाम सोसायटी, बालाजी गॉर्डन सोसायटी, सेक्टर १० या परिसरातून प्रचार रॅली सेक्टर ९ येथे येणार व त्याच ठिकाणी रॅलीची समाप्ती होणार आहे.
नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व अलिकडील राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आदरपूर्वक ‘त्यागमूर्ती’ या नावाने संबोधल्या जाणाऱ्या संदीप नाईकांनी गेली १० वर्षे या मतदारसंघाचे महाराष्ट्राच्या विधानभवनात प्रतिनिधीत्व केलेले आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची धुरा प्रामुख्याने संदीप नाईकांनाच सांभाळावी लागणार आहे.