सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ / navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- भाजपा+शिवसेना+आर.पी.आय.+मित्र पक्ष महायुतीच्या 151 बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या अधिकृत उमदेवार विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचा जाहीर पाठींबा दर्शविण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह नुकतीच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री. अध्यक्ष मनोहरशेठ पाटील, उपाध्यक्ष श्री. वसंत म्हात्रे, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सचिव श्री. सुदाम पाटील, श्री. नामदेव डाऊरकर व इतर सदस्य उपस्थित होते.
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आपली 5 वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली असून या 5 वर्षाच्या काळात त्यांनी आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सांगितलेल्या सर्व समस्यांचे काम केले असून आम्ही केलेल्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी आमच्या प्रकल्पग्रस्तांन बरोबर हितसंबंध जपत काम केले असून सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या या पहिल्या आमदार पाहिल्या असल्याचे मत एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री. मनोहरशेठ पाटील, यांनी सांगितले. एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचा यापूर्वीही आपल्या मागे उभा होता, आजही आहे आणि भविष्यात येणाऱ्या कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगात खंबीरपणे उभे राहणार असून येणाऱ्या 24 तारखेला होणाऱ्या विजयी जल्लोषाची आम्ही तयारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या निवडून येणार यात शंकाच नाही, परंतु त्या भरघोस मतांनी निवडून यावे याकरिता एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती, नवी मुंबई यांचा जाहीर पाठींबा दर्शवित असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या दिलदार व्यक्तिमत्व असून त्यांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण केल्याशिवाय त्या स्वस्थ बसत नसल्याचे सांगत यापुढेही त्याच आमदार म्हणून आम्हाला हव्या असल्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे एम.आय.डी. व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री. मनोहरशेठ पाटील यांनी सांगितले.