सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ – navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : 20१८ मध्ये दसऱ्यायाच्या शुभमुहूर्तावर स्थापना केलेल्या नवी मुंबई सामाजिक
पुर्नवसन संस्थेचा आज प्रथम वर्धापन दिन व संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष दशरथ भगत यांचा
वाढदिवस अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने आज वाशी येथील सिडको एक्झिबिशन
सेंटर ऑॅडिटोरियम येथे उत्साहात संपन्न झाला.
नवी मुंबईतील मुळ गावांमधील प्रकल्पग्रस्तांच्या विविध
समस्या, प्रश्न व मागण्या तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व भविष्यातील गरजा
यांचे निर्मुलन योग्य पध्दतीने व्हावे, नवी मुंबई क्षेत्रात येणाऱ्या एम.आय.डी.सी.
बाधित गावातील व झोपडपट्टी क्षेत्रातील नागरिकांचे विविध पुर्नवसनाचे प्रश्न, नेरूळ,
कोपरखैरणे, घणसोली व नवी मुंबईतील अन्य नोडमध्ये असलेल्या माथाडी वसाहतीतील वाढीव बांधकाम
केलेल्या घरांचे नियमितीकरण, फेरीवाला धोरणाबाबत फेरीवाल्यांना न्याय मिळणे, शहरातील
रिक्षा व टॅक्सी चालकांचे विविध प्रश्न, शाळा, महाविद्यालयांमधील आरक्षण, फी विषयक,
शैक्षणिक सुविधांविषयीचे प्रश्न तसेच नव्या मुंबईतील ए.पी.एम.सी. मार्केटसह इतर किरकोळ
व घाऊक व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि समाजातील इतर बाधित घटकांना न्याय देण्याच्या उद्दिष्टांसह
स्थापन झालेल्या संघटनेने वर्षभरात केलेली वाटचाल ही यावेळी उपस्थितांना विषद करून
सांगण्यात आली.
ज्यामध्ये प्रामुख्याने वाशीगांव येथील सायन- पनवेल महामार्गावर वाशी नोडमध्ये प्रवेश करण्यासाठी महामार्गाखालून पनवेलच्या व मुंबईच्या दिशेने व्हेयीकुलर अंडरपास सह मार्गिका महामार्गावर सिग्नल यंत्रणा यासाठी केलेला तीव्र रास्ता रोको, जनआंदोलन, महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पणन खात्याअंतर्गत येणाऱ्या तुर्भे येथील मॅफको मार्केटमधील गाळेधारकांना वेठीस धरणाऱ्या महापालिका प्रशासनाविरोधातील आंदोलन, वाशी शहरातील सिडको बाधित धोकादायक इमारतींतील/सोसायट्यांच्या पुर्ण पुर्नवसनासाठी केलेले एक दिवसीय लाषणिक उपोषण, सानपाडा येथील ओरिएंटल कॉलेज शेजारी रेल्वे रूळालगत रेल्वे प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या उंच विकृती भिंतीविरोधातील आंदोलन, नवी मुंबईतील धोबी समाज बांधवाच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी संघटना बांधणीसह नवी मुंबईतील इतर अनेक घटक व जनता यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी जनआंदोलने व त्यातील सहभाग यातून संस्थेने नवी मुंबईतील सर्व सामान्य नागरिकांच्या मनात आपली जागा निर्माण करीत आहे व यापुढे जनतेसाठीचा लढा न्याय्य मार्गाने सुरू राहिल. या आंदोलनांमध्ये बऱ्याच अंशी न्याय देण्यात संस्था व संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ भगत यशस्वी झाले आहेत. संघर्ष व चळवळ या सुत्रांनुसार कायम सामाजिक व राजकीय क्षेत्रात क्रियाशील राहिलेले संस्थेचे अध्यक्ष दशरथ जी भगत हे आपणांस सर्वांस परिचित आहेतच. आज संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व आपल्या वाढदिवसपर शुभेच्छांचा स्विकार करताना दशरथ भगत यांनी नवी मुंबई पुर्नवसन संस्थेमार्फत आगामी काळात संस्थेस सहभागी असलेल्या व भविष्यात जुळणाऱ्या सहकारी मित्र, हितचिंतक व कार्यकत्र्यांसाठी ‘‘चला प्रशासनाकडे…..’’ या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध घटकांना न्याय मिळण्यासाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी व इतर आस्थापनांकडे प्रश्न मांडणे व त्याची सोडवणूक कशी करावी या विषयी प्रबोधन करून प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे आजपासून नवी मुंबईतील नोंदणीकृत नसलेल्या परंतु कष्टाचे काम करीत असलेल्या बाधित श्रमिक मजदूर कामगारांसाठी नवी मुंबई माथाडी व जनरल कामगार युनियनचे कार्यालयाची वाशी येथील हावरे फॅन्टासिया मॉल येथे स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे श्रमिक माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील अशी ग्वाही दिली. आगामी काळात संस्थेस जोडण्यासाठी व संस्थेचा विस्तार होण्यासाठी सभासद नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे म्हटले. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून शहरातील सत्तेत असलेल्या नेतृत्वाकडून व विरोधातील नेतृत्वाकडून शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या विविध मागण्या पुर्णत्वास नेण्यासाठी एकत्रित यावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. नवीन प्रवाहात आणि नवीन नेतृत्वात कार्य करताना शहरातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय घडांमोडीवर दशरथ भगत यांचे नेतृत्व हे शहराच्या विकासासाठी व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनातील आणि सत्तेतील नेतृत्वाला कायम जागृत करीत राहणार. यासाठी जनतेसह सत्ताधारी नेतृत्व व विरोधी नेतृत्वाने कायम आमच्या संस्थेच्या पाठिशी सकारात्मक दृष्कोनाने रहावे अशी नम्र हाकदेखील दशरथ भगत यांनी आपल्या भाषणातून दिली.
या कार्यक्रमास लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नगरसेविका वैजंयती भगत, फशीबाई भगत, रूपालीताई भगत, युवा नेते निशांत भगत, विजय वाळूंज यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.