डॉ. भक्तीकुमार दवे यांनी केला कांतीलाल कडू यांच्या विजयाचा दावा
राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
पनवेल: पनवेल विधानसभा मतदार संघाचे प्रचारात आघाडीवर राहिलेले उमेदवार कांतीलाल कडू यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कडू यांच्या मातोश्री हिराबाई कडू यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ झाला. अहवालाला निश्चयनामा असे नामाभिमान देण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कांतीलाल कडू सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय आणि संस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्याचा लेखाजोखा निश्चयनाम्यात मांडण्यात आला आहे.
कांतीलाल प्रतिष्ठान आणि पनवेल संघर्ष समितीने आंदोलन, उपोषण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांमधून मिळवलेल्या यशाची माहिती असून पनवेल विधानसभा मतदार संघातील विकासाचा आलेख वाढविण्यासाठी कडू यांनी घेतलेले परिश्रम आणि पुढे घ्यावयाची काळजी यासाठी काही ठोस निर्णय घेतले आहेत, त्याचा यात समावेश आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघातील किमान पाच लाख मतदारांपर्यंत हा लेखाजोखा पोहचविण्यासाठी कडू यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
याप्रसंगी रूपा कडू, मंगल भरवाड, सत्यवान पाटील, महेंद्र भगत, रामाश्री चौहान, निलेश काकडे, अजय म्हात्रे, एकनाथ बहिरा सचिन पाटील, आकाश शेळके, आनंद पाटील, गौरव भगत, भावेश पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली.
अपक्ष उमेदवार इतिहास घडवणार!
पनवेल विधानसभा मतदार संघात समस्यांचा ढिगारा उपसण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. शेकाप, भाजपाने केवळ बढाया मारण्यात वेळ खर्च केल्याने नागरिकांना दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा कंटाळा आला आहे. त्यामुळे यंदा अपक्ष उमेदवार कांतीलाल कडू नक्कीच बाजी मारून इतिहास घडवतील असे सगळीकडे वारे वाहू लागले आहेत. पनवेलसाठी यंदा कडू यांची शिट्टी हा एकमेव पर्याय आहे. दरम्यान कडू यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार पिछाडीवर पाडले आहेत.