नवी मुंबई – दसऱ्याला तुळशी रोप देऊन सानपाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. सानपाडा सेक्टर ८ येथील श्री गणेश मंदिरात विभागातील ज्येष्ठ नागरिक डॉ. कुलकर्णी काका हस्ते श्री गणेशाला नारळ वाढवून तसेच गणेश पूजन करून १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री.गजानन काळे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. दसऱ्याला सोन्याच्या रुपानं आपट्याची पान देण्याची परंपरा आहे. यंदा आपल्या महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती ओढवली होती. पूरस्थितीच्या झळा पोहोचत असतानाच, सण साजरे करतानाही इकोफ्रेंडली पर्याय शोधून काढणं गरजेचं होतं. त्यामुळे यंदा दसऱ्याच्या सणाला आपट्याची पानं देऊन पर्यावरणाचा ऱ्हास करण्यापेक्षा, संदेशाच्या रुपानं सोनं देण्याकडे मनसेचा कल होता. कुंभ कर्ण सारख्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सानपाडा विभागाच्या वतीने जनतेला घरोघरी जाऊन आपट्याच्या पानांऐवजी तुळशीचं रोपटं देऊन तसेच हाताला काळ्या फिती लावून ‘झाडे लावा झाडे जगवा’ ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ असा संदेश देत राज्य सरकारचा निषेध करत हा सण साजरा करण्यात आला असल्याचे मनसेचे सानपाडा पामबीच विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी सांगितले.तसेच विभातील नागरिकांना मनसेच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या.यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर सचिव विलास घोणे, उपविभाग अध्यक्ष अजय देशमुख, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, उपविभाग अध्यक्ष संजय पाटील, शाखा अध्यक्ष मुकुंद पाटील, शाखा अध्यक्ष अमन गोळे, महाराष्ट्र सैनिक ओमकार तोटकेकर, विनायक काबुगडे, हर्ष पालकर उपस्थित होते.