राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
उरण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील जसखार,चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांनी एक संघ होऊन भाजपा पक्षात पक्ष प्रवेश करुन माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याचे होऊ घातलेल्या उरण विधानसभा मतदारसंघात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.अशा आदिवासी तसेच विविध पक्षांतील पक्ष प्रवेश करणाऱ्या तरुणांच्या मागे मी जनसेवक म्हणून खंबीरपणे उभा राहणार असा विश्वास उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी भाजपा कार्यर्कत्यांच्या आग्रह खातर व उरण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आपल्या मित्राला आशिर्वाद देण्यासाठी गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर हे उरणात आले असता त्यांच्या उपस्थित उरण येथे पक्षप्रवेश कार्यक्रमा प्रसंगी भाजपचे नेते तथा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे जाताना महेश बालदी बोलत होते.
महेश बालदी यांनी पुढे सांगितले की आज शिवसेना पक्ष भाजपा उमेदवारांविरोधात धनुष्य बाण हि निशाणी घेऊन निवडणूकीला सामोरे जात आहेत.हा युतीला दिलेला धोका आहे.परंतू आम्ही कोणत्याही प्रकारे कमळ या भाजपाच्या निशाणी वर निवडणूक न लढविता उरणच्या विकासासाठी व कार्यर्कत्यांच्या आग्रह खातर शिटी ही अपक्ष उमेदवाराची निशाणी घेऊन निवडणूकीला सामोरे जात आहोत.हा युती सोबत आम्ही केलेला विश्वासघात नसून त्यांनी कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ सारख्या इतर मतदार संघात भाजपा उमेदवारा विरोधात धन्युष बाण ही निशाणी घेऊन भाजपा पक्षाबरोबर केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे आज विश्वास घातकी पक्षाना सोडून त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा ओढा हा भाजपा पक्षा कडे आकर्षित होत आहे.
यावेळी महेश बालदी यांनी गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनयजी तेंडुलकर यांच्या उपस्थित जसखार गावातील ग्राहक संरक्षण कक्षाचे उपप्रमुख धनंजय हरि भगत, नरेश मोरेश्वर घरत,करण् भगत तसेच चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील विश्राम राम मोहिते,उषा राम मोहिते,रोशनी विश्वास मोहिते,प्रितम दत्ताराम मोहिते, अमित विश्वनाथ पाटील,मनोज गोपाळ पाटील,पुष्पा दत्ताराम मोहिते आदिंसह एकूण ३५ पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ व खांद्यावर भाजपाचा झेंडा देऊन भाजपा पक्षात स्वागत केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनयजी तेंडुलकर यांनी उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले मित्र तथा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्या मागे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी खंबीरपणे उभे राहण्याचे उपस्थितांना आवाहन केले.याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, वाहतूक विभाग जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते सुधिर घरत,सुरेश पाटील, नगराध्यक्षा सायली म्हात्रे,युवा नेते तथा महालण विभागाचे अध्यक्ष महेश कडू, दिनेश तांडेल,प्रकाश कडू,दिपकशेठ भोईर, उपनगराध्यक्ष जयवित कोळी,महिला संघटना अध्यक्षा राणी म्हात्रे, भाजपचे तालुकापाध्यक्ष प्रकाश ठाकूर,तालूका चिटणीस सूनिल पाटील,जासई विभाग अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे,प्रल्हाद पाटील,माजी सरपंच विलास पाटील,तालुका उपाध्यक्ष पंडित घरत,माजी सरपंच जितेंद्र घरत, कुलदीप नाईक, सरपंच दामूशेठ घरत, सरपंच अजित पाटील, संदिप पाटील, शहराध्यक्ष कौशिक शहा, सरपंच ज्योती परशुराम म्हात्रे,हरेश भोईर,रमेश फोफेरकर,नदूकुमार चिरनेरकर,दिपकशेठ पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर,कोळी समाजाचे नेते प्रदिप नाखवा सह उरण शहर,चाणजे,नवघर,जासई,चिरनेर जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.