सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ / navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईचे विकासपर्व, नवी मुंबईचे ओबामा व अलीकडच्या काळातील बदलत्या वादळी राजकीय घडामोडींमुळे त्यागमूर्ती या नव्या नावाने महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या संदीप नाईकांचीच छाप नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचारयंत्रणेवर पहावयास मिळत आहे. प्रचारयंत्रणेतील नियोजन, वेळचे टायमिंग, कार्यकर्त्यांना उत्साहीत ठेवणे व पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहीत करणे या कर्तबगारीमुळे विकासपर्व संदीप नाईक यांच्याकडे नवी मुंबईतील सर्वच राजकीय धुरींणाचे लक्ष वेधले गेले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून राज्याच्या विकासाला गती देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मध्ये ज्या आमदारांचा समावेश होत आहे, त्यामध्ये प्राधान्याने संदीप नाईकांचा अग्रक्रम होता. ऐरोली मतदारसंघाचे महाराष्ट्राच्या विधानभवनात २००९ ते २०१४ आणि २०१४ ते २०१९ अशी सलग दहा वर्षे संदीप नाईकांनी प्रतिनिधीत्व केलेले आहे. विकासकामांच्या पाठबळावर आणि दांडग्या जनसंपर्काच्या जिव्हाळ्यावर २०१४च्या मोदी नावाच्या चक्रीवादळातही संदीप नाईकांमुळे ऐरोलीच्या गडाला तडा देणे कोणालाही शक्य झाले नाही. पहिल्या विधानभवनात अधिवेशनात संदीप नाईकांची शंभर टक्के हजेरी तर दुसऱ्या विधानभवनात संदीप नाईकांची ९८ टक्के हजेरी होती. आजारी असतानाही मतदारसंघातील कामासाठी स्वत:ला उभे राहवत नसतानाही, अंगात कमालीचा अशक्तपणा असतानाही आजाराचे चोचले न पुरविता हा लढवय्या संदीप नाईक विधानभवनात जावून कामकाजात सहभागी होवून दमदारपणे आपली भूमिका मांडताना उभ्या महाराष्ट्राने व विधानभवनाने जवळून पाहिला आहे. यंदाच्या निवडणूकीत भाजपकडून संदीप नाईकांनाच तिकिट देण्यात आले होते. परंतु नवी मुंबईकरांच्या लाडक्या लोकनेत्यासाठी, नवी मुंबईच्या शिल्पकारांसाठी आपल्या राजकीय वाटचालीला कडीकुलुपात बंद करून संदीप नाईकांनी आपले वडील गणेश नाईकांना निवडणूक रिंगणात उतरविले. स्वत:ची बहरलेली राजकीय कारकिर्द स्वत:च्या हाताने काही काळासाठी संपुष्ठात आणणे हे अग्निदिव्य कोणाही सोम्या-गोम्याला नक्कीच जमणार नाही. वडीलांवरील प्रेमापायी संदीप नाईकांनी हे केले. म्हणूनच ईतिहासालाही या त्यागमूर्तीची दखल घ्यावीच लागली.
ऐरोली विधानसभा मतदारसंघ हा संदीप नाईकांच्या परिचयाचाच नव्हे तर पायाखालचा आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मतदारसंघात सतत जनसंपर्क ठेवणारा आमदार अशी मतदारांमध्ये संदीप नाईकांची प्रतिमा आहे. दिघा ते तुर्भे व्हाया कोपरीगाव व वाशीचा वळसा या दरम्यान विखुरलेल्या ऐरोली मतदारसंघाचे विधानभवनात प्रतिनिधीत्व करताना संदीप नाईकांनी येथील जनसामान्यांशी जवळीक ठेवली आहे. सध्या भाजपकडून ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून लोकनेते गणेश नाईक निवडणूक लढवित असले तरी पडद्यामागून नियोजन संदीप नाईकच सांभाळत असल्याची बाब आता लपून राहीलेली नाही. प्रचारयंत्रणेचे टायमिंगचे गणित साधण्यात संदीप नाईक हा खरोखरीच वापमाणूस आहे. कार्यकर्त्याच्या भेटीगाठी, पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविणे, नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील प्रचाराबाबत विश्वासात घेवून प्रचाराची गती समजावून घेणे ही कामे पडद्याआडून संदीप नाईक उत्साहाने सांभाळत आहे. ऐरोलीची निवडणूक संदीप नाईकांनी प्रतिष्ठेची बनविल्याने या मतदारसंघातून भाजप विक्रमी मताधिक्य घेणार याची ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. आजही संदीप नाईक जेमतेम ४ ते ५ तास झोपत असल्याने कार्यकर्त्यांना ते दिवसा व रात्री कधीही उपलब्ध होत आहे. कोठे किती प्रचारसाहित्य गेले आहे, कार्यअहवाल किती वाटला गेला, कोण नाराज तर नाही ना, याची इंत्यभूत माहिती संदीप नाईक सातत्याने जाणून घेत असतात. दिघा, ऐरोली, घणसोली कॉलनी, कोपरखैराणे, तुर्भे, कोपरखैराणे, गावचा परिसर आदी मतदारांशी संदीप नाईक सुसंवाद ठेवून आहेत. संदीप नाईक रॅलीत सहभागी झाल्यावर सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावरून ओंसडून वाहणारा उत्साह गेल्या १० वर्षातील संदीप नाईकांच्या कामाची पोचपावती देत आहे. संदीप नाईकांनी तिकिट नाकारल्यावर संदीप नाईकांना मानणाऱ्या घटकांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली होती व आजही ही नाराजी कायम आहे. पण आपल्या नेत्यानेच प्रचारात झोकून दिल्याचे पाहिल्यावर आणि आपला नेता १८ ते २० तास प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे दिसून आल्यावर संदीप नाईकांच्या चाहत्यांनी, समर्थकांनी पुन्हा आपली जबाबदारी उचलण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे नव्या व जुन्या कार्यकर्त्यात व पदाधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी संदीप नाईकांनी मोलाची भूमिका बजावली आहे. ऐरोलीची प्रचारयंत्रणा ही संदीप नाईकांमुळे नियोजनात्मक सुरू असल्याने इतर मतदारसंघामध्ये संदीप नाईकांच्या रणनीतीची उघडपणे चर्चा व प्रशंसा होवू लागली आहे.