राजेंद्र पाटील : ९९६७२८५६१८
रसायनी : रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग आहे.या परिसरातील रसायनी व अतिरीक्त एमआयडीसीतील वाढती कारखानदारी , कामासाठी बाहेरुन येणाऱ्या कामगार वर्ग यामुळे परीसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.परीसराचे मुख्य केंद्रबिंदू असणा-या मोहोपाडा वासांबे ग्रामपंचायतीची लोकसंख्या चालीस हजारांपेक्षा जास्त असल्याने परीसराचा हवा तसा विकास झाला नाही.परीसराची सुसज्ज बाजारपेठ म्हणून मोहोपाडा शहराची ओळख आहे.परंतु रस्त्यावर बस्तान मांडून बसलेले फेरीवाले, हातगाडीवाले यांना पर्यायी जागेची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.जवलच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, महाविद्यालये, शासकीय कार्यालये असल्याने येथे सुसज्ज रुग्णालयाची आवश्यकता आहे.सर्वसामान्यांच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रुग्णालय हे महत्त्वाचे आहे.परीसरात काही अपघात घडल्यास पनवेल, मुंबई,पुणे येथील रुग्णालयात जावे लागते. यावेळी प्रवासात वेल जात असल्याने रुग्ण दगाविण्याची अधिक शक्यता असून अशा काही घटना घडल्याही आहेत.यासाठी रसायनीत ट्रामा सेंटर उभारणार असल्याचे उरण विधानसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज व डॅशिंगनेते उमेदवार महेश बालदी यांनी सांगितले. मोहोपाडा ग्रामपंचायतीवर मोठा भार पडला आहे.येथील लोकसंख्येचा विचार करता या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होणे गरजेचे आहे.तसेच परीसराला भेडसावणारी पाणी समस्या,कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंड आदी समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असून माझ्यावर येथील जनतेने दाखविलेल्या विश्वासाला कधी तडा जावू दिला जाणार नाही अशी ग्वाही महेश बालदी यांनी दिली. बालदी यांना प्रचारादरम्यान मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘शिट्टी’ चा आवाज उरण विधानसभा मतदार संघात घुमत आहे.