सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : भाजपा-शिवसेना-आरपीआय-रयतक्रांती-रासप-शिवसंग्राम महायुतीचे ऐरोली विधानसभा मतदार संघातील उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांच्या निवडणूक प्रचार फेर्यांमध्ये हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत असून त्यांच्या विजयासाठी प्रत्येकाने संकल्प केल्याचे दिसून येत आहे.
महापे, अडवली-भुतवली, तुर्भे आणि पावणे येथे पार पडलेल्या प्रचारादरम्यान लोकनेते नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा विकास केला आहे असे सांगून नवी मुंबईच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी त्यांना ऐरोली मतदार संघातून जिंकून देण्याचे आवाहन केले.
महापे येथील प्रचार फेरीत माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील आदी तर पावणे गांव येथील प्रचार फेरीप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, दशरथ भगत, नगरसेविका मनीषा भोईर,माजी नगरसेवक शशिकांत भोईर आणि महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होेते.
अडवली-भुतवली येथील प्रचार फेरीप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, नगरसेवक रमेश डोळे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तुर्भे स्टोअर के.आर रोड ,बाबा गल्ली आणि इंदिरानगर येथील प्रचार फेरीप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, माजी उपमहापौर भरत नखाते, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, शिवसेना नगरसेवक राजू शिंदे,
आरपीआयचे सिद्राम ओहोळ,नगरसेविका राधा कुलकर्णी,नगरसेविका संगीता वास्के,नगरसेविका मुद्रिका गवळी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने भाग घेतला.