सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘मतदानाने लोकशाही सदृढ होते त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होवून निर्भयपणे मतदान करावे’, असे आवाहन ऐरोली विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांनी सोमवारी केले.
कोपरखैरणेच्या रा. फ. नाईक विद्यालयातील मतदान केंद्रावर लोकनेते नाईक यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा अधिकार बजावला. ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नगरसेविका वैशालीताई नाईक, युवानेते संकल्प नाईक आदी कुटुंबातील मान्यवर सदस्यांनी देखील लोकशाहीचे आपले पवित्र कर्तव्य पार पाडले.
जिंकून आल्यावर शहरातील गरजेपोटीची घरे नियमित करणे, सिडकोनिर्मित धोकादायक बनलेल्या इमारतींची पुनर्बांधणी आणि झोपडपटटीवासियांना झोपडपटटी विकास योजनेतून चांगली घरे उपलब्ध करुन देणे या कामांना प्राधान्य देणार आहे, अशी माहिती लोकनेते नाईक यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली. त्यासाठी या विषयांतील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेवून बैठकांमधून एक परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात येईल आणि तो राज्य शासनाला सादर करण्यात येईल, असे देखील ते म्हणाले.