सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिवसेना शाखा क्रं ८७ आणि स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या माध्यमातून महागाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याची विक्री करण्यात येणार आहे.
नेरूळ सेक्टर ८ मधील स्टेशन रोडवरील शिवनेरी अपार्टमेंटमधील शिवसेना शाखेत २२ ऑक्टोबरपासून सांयकाळी ५ वाजल्यापासून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याच्या विक्रीस प्रारंभ होणार असल्याची माहिती शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे यांनी दिली.
शिवसेना शाखेकडून चालविण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख अभियानात नेरूळवासियांना अवघ्या ११५ रूपयांमध्ये साखर १ किलो, मैदा अर्धा किलो, चणाडाळ अर्धा किलो, रवा अर्धा किलो, पोहे अर्धा किलो आदी दिवाळी फराळाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपअधिकारी निखिल रतन मांडवे यांनी दिली.
महागाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जनतेला दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न असून या उपक्रमात नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होबून दिवाळी फराळ साहित्य खरेदी करण्याचे आवाहन स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.