राजेंद्र पाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कुकशेत गावाला वारकऱ्यांची परंपरा आणि आध्यात्माची आवड असलेले कुकशेत गाव. याच गावातील माजी सरपंच व वारकरी चळवळीची ओढ असणारे बाळाराम पाटील व त्यांचे सहकारी आजही वारकऱ्यांची सेवा करत असतात. त्यांच्याच आयोजनातून कुकशेत गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजनही करण्यात येत असते. गुरूवारी घणसोली गावातून निघालेल्या दिंडीला कुकशेत ग्रामस्थांच्या वतीने दुपारचे भोजन देण्यात आले.
सालाबादप्रमाणे वैकुंठवासी ह.भ. प. तुकाराम महाराज रानकर यांनी सुरु केलेली दींडी ह.भ.प. सुनिल महाराज रानकर यांच्या नेतृत्वाखाली देवाची आळंदी येथे प्रस्थान करते. नवी मुंबईमधुन शेकडो वारकरी या पायी दीडींत सहभागी होतात. घनसोली गावातून सकाळी प्रस्थान झाल्यानंतर दुपारच्या भोजनाचा मान कुकशेत ग्रामस्थांचा असतो आणि या कार्यात सारसोळे ग्रामस्थांचेही मोठे योगदान लाभते. दरवर्षी वारकऱ्यांच्या पंगतीसाठी भोजन बनविण्यापासून ते वारकऱ्यांना वाढण्यापर्यत सौ. सुजाता पाटील यांचा उत्साहाने, भाविकतेने सहभाग ठरलेला असतो.
याक्षणी दिंडी आयोजकांच्या वतीने कुकशेत गावचे माजी सरपंच श्री बाळाराम कान्हा पाटील व महीला बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांचा सन्मान करण्यात आला.