श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८५ व ८६ मधील नागरी कामांसाठी, नागरी सुविधांसाठी व समस्या निवारणासाठी भाजपाचे युवा नेते व नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांच्यासमवेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील आणि प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली.
सदर भेटीदरम्यान दोन्ही प्रभागातील नागरी कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती या नात्याने सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील गरजवंत विद्यार्थ्यांना मागील वर्षाची तसेच चालू वर्षी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये दिरंगाई होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून सदर शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना लवकरात लवकर देण्यासाठी आयुक्तांना विनंती केलेली आहे.
नगरसेवक सुरज बाळाराम पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील तसेच नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांनी प्रभागातील मंजूर केलेले पालिका विभाग कार्यालय, मार्केट या कामांची टेंडर नोटीस काढणे, पामबीच सर्व्हिस रोड शेजारी सुशोभीकरण कामाचा प्रस्ताव मंजूर करणे, कुकशेत येथील आरोग्य केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करणे, स्मशानभूमी उभारणे, कुकशेत गांव मैदान सुधारणा करणे, फिटनेस सेंटर प्रस्ताव मंजूरीस पाठविणे, भूखंड क्र. OS-3 येथील उद्यान उभारणे, सारसोळे गाव व कुकशेत गाव येथे अजुन दोन प्रवेशद्वार उभारणे, (बामनदेव ) होल्डिंग पॉड कडे जाणारा रस्ता बनविणे, आगरी कोळी संस्कृतीदर्शक शिल्प उभारण्याचे काम मार्गी लावणे, जेट्टीवर सुविधा उपलब्ध करणे, आरोग्याच्या दृष्टीकोनातून विशेष फवारणी मोहीम राबिवणे, प्रभागात स्वच्छता राखणे करिता संबंधितांना सूचना करणे व प्रभागातील इतरत्र विकास कामे या संबंधी आयुक्तांशी चर्चा करून सदरची कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याची मागणी आयुक्तांकडे केलेली आहे. यावेळी सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले असल्याची माहिती सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिले