श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : युवा सेनेच्यावतीने नेरूळ सेक्टर 8 परिसरात बालदिनाचे औचित्य साधून ‘दिल तो बच्चा है’ या कार्यक्रमाचा बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हा बालदिन उत्साहात साजरा झाला. युवा सेनेचे उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेे होेते.नेरूळ सेक्टर 8 मधील एल मार्केट आवारात सांयकाळी 6 ते 10 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 500 हून अधिक मुले सहभागी झाली होती. लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग या खेळाचे आयोजन करण्यात आलेे होते. यासह मिकी माऊस व डोरी मॉल या कार्टूनची वेशभूषा घालून लहान मुलांचे मनोरंजनही जादूचे खेळ करणार्यांकडून करण्यात आले होते. यासह लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेे होते. लहान मुलांना यावेळी बर्गर. फ्रुटी, पॉप कार्नचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमात किल्ले निर्मिती प्रोत्साहन अभियानात सहभागी होवून किल्ले बनविणार्या मुलांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात विभागातील मुले, त्यांचे पालक यासह शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे, उपविभागप्रमुख संतोष थोरात, शिवसेना शाखाप्रमुख गणेश कुलकर्णी. महिला विभाग संघठक शलाका शरद पाजंरी यांच्यासह शिवसेना व युवा सेना पदाधिकारी, महिला पदाशिकारीही कार्यक्रमात सहभागी झालेे होते.