श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ येथील शिवा पामबीच सोसायटी, सागरसंगम, वाधवा टॉवर ते सानपाडा पामबीचला जोडणारा सर्व्हिस रोड निर्माण करण्याची लेखी मागणी नेरूळ तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर ४ येथील शिवा पामबीच सोसायटी, सागरसंगम, वाधवा टॉवर ते सानपाडा पामबीच परिसरात सर्व्हिस रोड महापालिका प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर निर्माण करावा यासाठी रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन सादर केले.
दोन्ही विभागातील रहीवाशांना ये-जा करण्यासाठी
पामबीच मार्गाचा अथवा जुईनगर-सानपाडा या अंर्तगत मार्गाचा वापर करावा लागतो. वाधवा
टॉवर ते सानपाडा पामबीच मार्ग झाल्यास स्थानिकांना
पामबीच मार्गावर जावे लागणार नाही. पामबीच मार्ग सततच्या अपघातांमुळे कलंकित झालेला
आहे. स्थानिक रहीवाशांनी वाधवा टॉवर ते सानपाडा पामबीच मार्ग या अंर्तगत परिसरात सर्व्हिस
रोड व्हावा अशी मागणी दोन्ही विभागातील रहीवाशांकडून रवींद्र सावंत यांच्याकडे सातत्याने
करण्यात येत आहे. हा सर्व्हिस रोड झाल्यास नेरूळ सेक्टर ६, १२, १६, १८, २४ मधील रहीवाशांनाही
या सर्व्हिस रोडचा फायदा होईल. नेरूळ पश्चिम परिसरातील रहीवाशांसाठीही भविष्यात हा
सर्व्हिस रोड उपयुक्त ठरण्याची शक्यता असून यामुळे
वेळेची व इंधनाचीही बचत होईल, असे रवींद्र सावंत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे.
आपण लोकांच्या मागणीस्तव आपण या ठिकाणी पाहणी अभियान राबवून त्या
अभियानात स्थानिकांना सहभागी करून घ्यावे. स्थानिकांशी चर्चा केल्यास आपण त्या मागणीतील
गांभीर्य समजून येईल. हा अंर्तगत रस्ता बनविणे खर्चिक बाब नाही. समस्येचे गांभीर्य
व स्थानिकांच्या मागणीतील कळकळ पाहता लवकरात लवकर पालिका प्रशासनाला निर्देश देण्याची
मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.