नवी मुंबई : पत्रकार दिनाचे औचित्य साधून नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि परिणाम या विषयावर नवी मुंबई प्रेस क्लब व नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोमवार, दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि परिणाम या विषयावर आयोजित परिसंवादात संविधान तज्ञ व मानवी हक्क विश्लेषक, सामाजिक न्याय भाष्यकार ॲडव्होकेट असीम सरोदे, प्राध्यापक डॉ.नरेंद्र पाठक, ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्य मराठी वृत्त समुहाचे राज्य संपादक संजय आवटे आणि भाजपाचे महाराष्ट्र सह-मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आपले विचार मांडणार आहेत.
नवी मुंबई व परिसरातील पत्रकारांसह शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी या परिसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
· ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रभात चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रशांत थोरात यांच्या सौजन्याने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर तसेच उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.