राजेंद्र पाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई: परिसरातील रस्त्यावर खड्डे पडून सहा ते आठ महिन्याचा कालावधी लोटला तरी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून खड्डे बुजविले जात नाहीत. येत्या ८ दिवसात नेरूळ सेक्टर ६ मधील उद्यानानजिकच्या अंर्तगत रस्त्यावरील खड्डे बुजविले न गेल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी त्याच खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक वृक्षारोपण करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
प्रभाग ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमधील एव्हरग्रीन व वरूणा सोसायटीलगतच्या संरक्षक भिंतीलगतच्या पदपथनिकटच असलेल्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविणेबाबत रा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार हे महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. १६ डिसेंबर २०१९ रोजी पालिका विभाग कार्यालयात समस्यापत्र सादर करूनही समस्येची दखल घेतली न गेल्याने आज पुन्हा तक्रारपत्र सादर करत खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासनाला ८ दिवसाची मुदत दिली आहे. अन्यथा एव्हरग्रीन व वरूण सोसायटीतील रहीवाशांना घेवून त्या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा महादेव पवार यांनी दिला आहे.
सिडकोच्या एव्हरग्रीन सोसायटी ते वरूणा सोसायटीजवळ येवून महापालिका प्रशासनाने पाहणी केल्यास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. पदपथालगतच्या रस्त्यावर समांतर पातळीवर गेल्या काही महिन्यापासून लांबवर खड्डे पडले आहेत. रिक्षाचालकांना, दुचाकीवाहनचालकांना व एव्हरग्रीन तसेच वरूणा सोसायटीतील रहीवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. येत्या ८ दिवसात हे खड्डे न बुजल्यास आम्ही एव्हरग्रीन व वरूणा सोसायटीतील रहीवाशी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी या खड्ड्यात प्रतिकात्मक वृक्षारोपण करून पालिका प्रशासनाचा नोंद घ्यावी असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी दिला आहे.