स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com-९८२००९६५७३
मुंबई – कॉंग्रेसचे मुखपत्र शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत निंदनीय शब्दांचा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात मुंबई भाजयुमोकडून निदर्शने केली.
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक केली.
कॉंग्रेसचे मुखपत्र शिदोरीच्या फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या लेखात स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्द लिहिले होते. याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाने मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस मुख्यालयासमोर आंदोलन केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कॉंग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.