स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून घणसोली गावामध्ये घणसोली नागरी आरोग्य केंद्र चालविण्यात येत आहे. घणसोली नागरी आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली असून रूग्णांना उपचार केल्या जाणाऱ्या या नागरी आरोग्य केंद्रात डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठेवून वावरावे लागत आहे. चार-पाच दिवसापूर्वी याच नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कंपाऊडरच्या डोक्यात वरून पंखा पडला. हा कंपाऊडर जखमी झाला आहे. या घटनेने नागरी आरोग्य काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाले आहे. या नागरी आरोग्य केंद्रात काम करण्याची कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. इतरांना उपचार करता करता आपणासही जायबंदी व्हावे लागेल, अशी भीती कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कामगार जायबंदी अथवा मयत होण्याची पालिका प्रशासनाने वाट न पाहता तात्काळ घणसोलीतील नागरी आरोग्य केंद्र सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत करण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
या नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती आहे. कामगारांचा उद्रेक झाल्यास व त्यांनी काम करण्यास नकार दिल्यास रूग्णांना उपचार भेटणार नाहीत. दुर्घटना झाल्यास अथवा कामगारांचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी. समस्येचे गांभीर्य पाहता आपण लवकरात लवकर घणसोली नागरी आरोग्य केंद्र एका चांगल्या जागेत स्थंलातरीत करावे. कामगारांना आरोग्य सुविधा कॅशलेस मिळावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. कामगारांच्या बाबतीत दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उपचार करून बिल पाठवा व नंतर बिलाचे पैसे मिळवण्यासाठी हेलपाटे मारायचे. रूग्ण अॅडमिट असताना घरच्यांनी पैशाची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करायची, हे कोठेतरी थांबले पाहिजे. रूग्ण दगावतात, मागील महिन्यात एक मुख्याध्यापकांचा मृत्यू झाला. शाळेत येताना अपघात झाला होता. लाखो रूपये खर्च झाला. मुख्याध्यापक रूग्णालयात असताना त्यांचा परिवार पैशाची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करत होता. हे आता खरोखरीच थांबले पाहिजे. कर्मचारी मयत झाल्यावर आता बिलासाठी नातलगांनी धावपळ करायची का? असा सवाल रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना विचारला आहे.
घणसोलीच नाही तर शिरवणेसह इतरही नागरी आरोग्य केंद्राची अवस्था बिकट आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. समस्या गंभीर आहे. योग्य ते निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.