महेश जाधव : Navimumbaillive.com@gmail.com: 9820096573
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम आता कोणत्याही क्षणी जाहिर होईल अथवा कोरोनामुळे निवडणूका कदाचित एक महिना पुढेही ढकलल्या जातील. परंतु नेरूळ नोडमध्ये प्रभाग 86 मध्ये राजकीय वातावरण तापण्यास कमालीचा प्रारंभ झाला आहे. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा काही प्रमाणात समावेश होत आहे. या ठिकाणी दररोज बाहेरच्या उमेदवाराच्या आगमनाची चर्चा होवू लागल्याने सारसोळे गावचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाची जनता संतप्त होवू लागली आहे. आम्हाला आता बाहेरचा नाही तर स्थानिकच उमेदवार पाहिजे असा सूर आळविताना सारसोळेच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहाच्या जनतेला आता मनोज मेहेरच उमेदवार हवा आहे अशी भूमिका मांडू लागली आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते वरच्या स्तरावरील राजकारण्यापर्यत सर्वानाच खुर्ची व पदाचा मोह असताना प्रभाग समिती सदस्य असणाऱ्या मनोज मेहेरने वारंवार समस्या सोडविण्याची व सुविधा पुरविण्याची मागणी करून व सभागृहाचे लक्ष वेधूनही आणि सभागृहात पोटतिडकीने बोलूनही इतिवृत्तात राजकीय दबावामुळे नोंद होत नसल्याने स्वाभिमानी वृत्तीचा बाणा जोपासत मनोज मेहेरने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हा स्वाभिमान मनोज मेहेरचा नव्हता, तर सारसोळे गावाचा व नेरूळ सेक्टर सहाचा स्वाभिमान होता, असे उघडपणे आता सारसोळे गावचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाची जनता बोलू लागली आहे.
मनोज मेहेरचे काय चुकले की ज्यासाठी काही मातब्बर राजकारण्यांना आपली प्रतिष्ठा मनोज मेहेरचे तिकीट कापण्यासाठी पणाला लावावी लागली असा संताप आता सारसोळेचे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाची जनता आपआपसातील संभाषणातून व्यक्त करू लागली आहे. प्रभाग समितीत सदस्य म्हणून काम करताना मनोज मेहेरने सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाच्याच समस्या प्रशासन दरबारी मांडल्या. सुविधांबाबत आग्रही भूमिका मांडली. मनोज मेहेरची ही चुक असेल तर तो गेली १५ वर्ष आमच्यासाठी ही चुक करत आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही निवडणूकीत मनोज मेहेरलाच मतदान करणार आणि निवडून आणणार. मनोज आमच्या घरातला स्थानिक उमेदवार असल्याची भाषा आता सारसोळे ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर सहाच्या जनतेकडून उघडपणे बोलली जावू लागली आहे. मनोज मेहेरच्या तिकिट मिळण्यात आणण्यात आलेले अडथळे व बाहेरच्याच उमेदवारांना निवडणूक प्रभाग ८६ तून लढविण्यासाठी वाढू लागलेले स्वारस्य आता सारसोळे ग्रामस्थांच्या व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांच्या निदर्शनास येवू लागले आहे. मनोज मेहेर गेली १५ वर्षे सारसोळे गावासाठी व नेरूळ सेक्टर सहासाठी मंत्रालय, महापालिका, सिडको व अन्य ठिकाणी पाठपुरावा करत असून तो स्थानिक उमेदवार आहे. स्थानिकाला नाकारायचे आणि बाहेरच्याला गोंजारायचे हे उद्योग प्रभाग ८६ मधील मतदारांकडून होणार नसल्याचा विश्वास सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रभाग ८६ मधून महाविकास आघाडी व भाजपने अद्यापि आपला उमेदवार निश्चित केलेला नसताना मनोज मेहेर व त्याच्या मित्र परिवाराने आम्ही निवडणूक लढविणार आणि जिंकणारच असा आत्मविश्वास व्यक्त करत निवडणूकीची रणनीती आखण्यास व मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केल्याने मनोज मेहेरचे पारडे प्रभाग ८६च्या निवडणूक रिंगणात जड मानले जात आहे. सारसोळे गावासाठी पाठपुरावा करणारा, संघर्ष करणारा अशी प्रशासन दरबारी विचारणा केल्यास मनोज मेहेर हेच नाव पुढे येते. पालकमंत्री गणेश नाईक असताना सारसोळे व सेक्टर सहासाठी सतत हेलपाटे मारणारा मनोज मेहेर एकमेव होता. सातत्याने जनसेवा करत नागरी समस्या सोडविणे, नागरी सुविधा मिळविण्यासाठी चपला झिजविणे आणि स्थानिक उमेदवार यामुळे मनोज मेहेरपुढे कोणीही बाहेरचा मातब्बर उभा राहीला तरी सारसोळे ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहाची जनता मनोज मेहेरची सोबत करणार असल्याचे चित्र सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये पहावयास मिळत आहे. मनोज मेहेरची तिकीट कापण्यात कोणी प्रतिष्ठा पणाला लावली व सारसोळेतून निवडणूक लढविण्यासाठी बाहेरचे कोणकोण घटक चाचपणी करत आहे याची माहिती उघड होवू लागल्याने, मनोज तू लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत असा विश्वास आता सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर सहाच्या जनतेकडून व्यक्त केला जावू लागला आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्यापूर्वीच जनतेमध्ये व सोशल मिडीयामध्ये मनोज मेहेरने जनसंपर्क अभियानात आघाडी उघडली आहे.