अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका पाणीपुरवठा विभागात कंत्राटी काम करणाऱ्या कामगाराच्या दुचाकीला मागाहून येवून ठोकर देणाऱ्यांनीच कंत्राटी कामगाराला प्राणघातक बेदम मारहाण करणाऱ्यांविरोधात एनआरआय पोलिसांनी केवळ एनसी दाखल केल्याने महापालिका कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सुशांत लंबे हे महपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात किसन कंन्स्ट्रक्शन या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. १५ मार्च रोजी सुशांत लंबे कामावर असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास करावे गावाजवळील तांडेल रोडवर सेक्टर ४४ येथील पाण्याच्या टाकीवरील एक वॉल बंद करून दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर जात होते. यादरम्यान कुलदीपक भोईर यांनी मागून अॅक्टीव्हावर येवून सुशांत लंबे चालवित असलेल्या होंडा शाईनला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून सुशांत लंबेंनाही दुखापती झाल्या आहेत. धडक दिल्यावर माफी मागण्याचे सौजन्य दाखविण्याऐवजी सुशांत लंबेना शिवीगाळ करत लाथा, बु्क्यांनी व हाताने चापटी मारत बेदम मारहाण केली. या घटनेनंतर सुशांत लंबेंनी तात्काळ एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, त्यांनी केवळ एनसी लिहून घेण्याचे सौजन्य दाखविले. आरोपींने गाडीला धडक देवून अपघात करत गाडीचे नुकसान केले, आरोपी व त्याच्या मित्राने बेदम मारहाण करत जिवितास धोका पोहोचविला आणि पोलिसांनी केवळ एनसी घेवून प्रकरण सोडून दिले. ही कायदा व सुव्यवस्थेची चेष्टा आहे. या गुन्हेगारांवर अपघात व मारहाणप्रकरणी कठोरात कठोर शासन होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. यामुळे महापालिका कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कामगारांनी तात्काळ नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांना फोन करून कल्पना दिली. रवींद्र सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत एनआरआय पोलिस ठाण्यातून सुशांत लंबे यांना घेवून वाशीतील पालिका रूग्णालयात गेले व लंबेंवर उपचार करवून घेतले. याप्रकरणी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी करून पाणीपुरवठा कामगार लंबे यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
सुशांत लंबे यांच्या पत्नी श्वेता लंबे यांनी याप्रकरणी आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असून आपल्या पतीला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगताना माझ्या यजमानांच्या जिविताला काही बरे-वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी कुलदीपक भोईर हेच जबाबदार असतील असा इशारा पोलिसांना दिला आहे.