नवी मुंबई : भाजप जनसंपर्क कार्यालय प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ येथे जनसेवक गणेशदादा भगत,आणि स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या वतीने आयोजित केलेल्या जेष्ठ नागरिक कार्ड आणि एम्प्लॉयमेंट कार्ड शिबिरास स्थानिक रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नोंदणी केलेल्या सदस्यांना मान्यवरांचे हस्ते जेष्ठ नागरिक कार्ड आणि एम्प्लॉयमेंट कार्डचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक कॉर्ड ६० सदस्यांना व ५२ सदस्यांना एम्प्लॉयमेंट कार्डचे जनसेवक गणेशदादा भगत,आणि स्थानिक नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत वाटप करण्यात आले.
यावेळी समाजसेवक संजय पाथरे,आनंदराव पवार,निवृत्तीदादा गर्जे, बाळासाहेब गर्जे, बाबा गुजर,पांडुरंग बेलापुरकर, दादा पवार, चंद्रकांत महाजन, गोरक्षनाथ गांडाल, अंकुश माने, रमेश नार्वेकर, विठल गांजवे, शांताराम मातेले, दत्तात्रय माने, वासुदेव पाटील, विकास तिकोणे, सागर मोहिते, संतोष बोडके, गणेश नागरगोजे, सुर्या पात्रा, अशोक गांडाल, सुधीर पोखरकर, संतोष शिंदे, रविंद्र भगत उपस्थित होते.