• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 14, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 27, 2020

युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार राज्याच्या रक्तपेढीस १०,००० रक्ताच्या पिशव्या

adminbyadmin
in Uncategorized
0
युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार राज्याच्या रक्तपेढीस १०,००० रक्ताच्या पिशव्या

आश्विनी भोईर

मुंबई : कोरोनाच्या भितीमुळे नागरिकांनी रक्तदान शिबिरांकडे पाठ फिरवल्यामूळे राज्याच्या रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुडवडा झाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची मोठी गरज रुग्णांना आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फेसबुक आणि ट्विटरवर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. सोबतच गर्दी टाळण्यासाठी सरकार आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करत टोकन पध्दतीने प्रत्येक नागरिकास वेगळी वेळ देण्याची सूचना देखील केली होती. या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोकन पद्धतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून राज्यात चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी कोरोनाच्या काळात जनतेला रक्तदानासाठी जनतेला  प्रवृत्त करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसने धुळ्यात आयोजित  केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले आहे.

युवक कॉंग्रेसतर्फे प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रुम उभारण्यात येणार असून एक हेल्पलाईन नंबर देखील देण्यात येणार आहे. आपल्या घरापासून कामानिमित्त दूर आलेले लोक २१ दिवसीय लॉकडाऊन मूळे इतर राज्यात अडकलेले लोक  मदतीसाठी आणि अन्न, वस्त्र निवारा तसेच वैद्यकीय आणि इतर गरजांसाठी युवक काँग्रेसशी संपर्क करू शकतील. सोबतच स्थानिक नागरिकांना रक्तदान करावयाचे असल्यास किंवा औषधाची गरज असल्यास ह्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात. तसेच, गर्भवती महिला, नवजात अर्भके,बालके, किमोथेरपी, डायलिलीसचे पेशंट. ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीसाठी कुणीही हेल्पलाईन वर संपर्क करू शकतील, अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसतर्फे राज्याच्या विविध भागात विद्यार्थ्यांना मोफत पार्सल जेवणाची व्यवस्था आणि पोलिसांना सर्जिकल मास्कचे वाटप देखील चालू आहे. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ही वचनबद्ध असून सर्वच पातळीवर युवक कॉंग्रेस लढण्यासाठी सज्ज असून संपूर्ण राज्यास युवक काँग्रेस दहा हजार रक्ताच्या बाटल्यांचा पुरवठा करेल, असे तांबे यांनी सांगितले. 

Previous Post

राज्यात रक्तसाठा आठलाय, सातच दिवसच पुरेल रक्त, रक्तदात्यांनो आता पुढं या रे ऽऽऽ

Next Post

करोनाग्रस्त परिस्थितीत अनेक संस्था, व्यक्ती यांचा मदतीचा हात

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

करोनाग्रस्त परिस्थितीत अनेक संस्था, व्यक्ती यांचा मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांच्या खिशातून होतेय जंतुनाशक फवारणी

लॉकडाऊन झाले, हातावर पोट आहे, जगायला तर पाहिजे, पानटपरीवाला झाला अंडीविक्रेता

लॉकडाऊन झाले, हातावर पोट आहे, जगायला तर पाहिजे, पानटपरीवाला झाला अंडीविक्रेता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com