• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 15, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 14, 2020

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

adminbyadmin
in Uncategorized
0
हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

अॅड. महेश जाधव : स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
रेल्वेच्या गाड्या सुटणार ही अफवा कुणी पसरवली?
वांद्रे स्टेशन बाहेरील जमावाला शांत करण्यासाठी आमदार आशिष शेलार यांची शिष्टाई
मुंबई : रेल्वेच्या गाड्या सुटणार ही अफवा कुणी पसरवली ? जमावाला कुठल्या संघटनेने गोळा केले? त्या संघटनेचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे?  मुंबईच्या विविध भागातून हजारोचा जनसमुदाय टाळेबंदी मध्ये अचानक रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? असे थेट सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
वांद्रे पश्चिम येथे मंगळवारी अचानक रेल्वेस्टेशन परिसरात स्थलांतरित नाका कामगार व बांधकाम मजुरांचा जमाव गोळा झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. या वेळी आमदार आशिष शेलार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जवळपास एक तास जमावाची शांततेसाठी शिष्टाई केली.पोलिसांच्या बरोबरीने ते जमावाला सामोरे गेले त्या सर्व मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
याबाबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, खरेतर पालकमंत्री म्हणून आपण घटनास्थळी तातडीने येण्याची गरज होती, नाही तर किमान खरी माहिती तरी घेणे अपेक्षित होते. चार-पाच दिवसापूर्वी बांधकाम आणि नाका कामगार संघटनेने या परिसरात निदर्शने केली होती, ती निदर्शने सरकारने गांभीर्याने का घेतली नाहीत?  सरकारने त्यां संघटनेशी चर्चा का केली नाही? त्यांची मागणी ही रेशनींगचे धान्य आणि अन्न मिळावे हीच होती. मुंबईच्या विविध भागातून आज अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का? नाका व बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देणे असलेली  हक्काची मदत या कामगारांना  अजून का मिळाली नाही ? ती फाईल कुठल्या टेबलवर का अडकुन पडली आहे  ? असे थेट प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
रेल्वेगाड्या सुरू करा, असा आताच्या घडीला युक्तिवाद करणे हा केवळ अपरिपक्वतेचे दर्शन घडवणारा आहेच, तसेच असे म्हणणाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही, याचे दर्शन करणारा आहे. आता जर देशभर लोक फिरू लागले तर लाँकडाऊनचा उपयोग काय? रेल्वे सेवा सुरू केल्याने १३० कोटी भारतीयांच्या आजपर्यंतच्या परिश्रमाचा पराभव होईल आणि कोरोना व्हायरस विरुद्ध भारताचा लढा कमकुवत होईल, असे ही आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
वांद्रे पश्चिमेला पोलिसांनी अधिक लक्ष देण्यात यावे या परिसरात विशेष पोलिस बल तैनात करावे अशी मागणी मी स्थानिक आमदार म्हणून केली होती, त्याकडे लक्ष दिले गेले नाही. स्थलांतरित मंजूरासह सर्वांनाच शिजलेले अन्न नव्हे तर रेशनिंगचे धान्य द्या, त्यासाठी आमचा आमदार निधी घ्या ,अशी मागणी केली. त्याकडे राज्य सरकारकडून लक्ष देण्यात आले नाही, तसेच वांद्रे येथील नाका कामगार संघटनेने दहा दिवसांपुर्वी निदर्शने केली होती. त्यांनी ही धान्य मिळावे अशी मागणी केली होती, त्याकडे का लक्ष देण्यात आले नाही? असे प्रश्न आमदार  आशिष शेलार यांनी उपस्थितीत केले आहेत.

Previous Post

डीमार्ट च्या कर्मचाऱ्यांना पोलिसांची बेदम मारहाण

Next Post

सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामध्ये धुरीकरणास महापालिकेकडून टाळाटाळ

Next Post
सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामध्ये धुरीकरणास महापालिकेकडून टाळाटाळ

सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामध्ये धुरीकरणास महापालिकेकडून टाळाटाळ

प्रभाग ९६ मध्ये भाजपची ऑनलाईन चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गायन स्पर्धा

प्रभाग ९६ मध्ये भाजपची ऑनलाईन चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गायन स्पर्धा

सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहामधील गटारांची तळापासून सफाई करण्याची मागणी

सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहामधील गटारांची तळापासून सफाई करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com