अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पावसाळा जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला असल्याने पावसाळीपूर्व कामाचाच एक भाग असलेल्या गटाराची सफाई या पार्श्वभूमीवर सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील अंर्तगत व बाह्य गटारांची तळापासून सफाई करण्याची मागणी सारसोळे गावचे भुमीपुत्र व गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासन करत असलेल्या कार्याची प्रशंसा करून मनोज यशवंत मेहेर आपल्या निवेदनात पुढे म्हणाले की, सध्या पावसाळा अवघ्या सव्वा महिन्यावर आलेला आहे. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा या खाडीकिनारी असलेला भाग आहे. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या आजाराचा नवी मुंबईत उद्रेक होतो आणि काही जणांना आपला जीवही गमवावा लागतो. पावसाळा तोंडावर आला असल्याने सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील अंर्तगत रस्त्यावरील व बाहेरच्या रस्त्यावरील तसेच गावातील सर्वच लहान मोठी गटारांची तळापासून लवकरात लवकर सफाई करण्यात यावी, तुंबलेला कचरा, माती सर्व बाहेर काढण्यात यावे आणि हा कचरा तेथून लवकर हटविण्यात यावा. समस्येचे गांभीर्य, तोंडावर आलेला पावसाळा आणि साथीच्या आजाराचा उद्रेक या पार्श्वभूमीवर सारसोळे ग्रामस्थांच्या व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांच्या जिविताला कोणताही संभाव्य धोका निर्माण होवू नये यासाठी लवकरात सारसोळे गावातील आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातील गटाराची तळापासून सफाई करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.