अॅड. महेश जाधव
नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असलेल्या नेरूळ सेक्टर चारमधील वाधवा टॉवरमधील रहीवाशांना डीमार्टच्या गाडीतून धान्य व अन्य जीवनावश्यक साहीत्य उपलब्ध झाले आहे. काही दिवसापूर्वीच नेरूळ पोलिसांनी याच ठिकाणी डीमार्टच्या कर्मचार्यांना मारहाण केल्याने कोणीही या टॉवरमध्ये डीमार्टचा कर्मचारी येण्यास तयार नव्हता. तथापि नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी डीमार्टच्या व्यवस्थापणाशी चर्चा करून रविवारी सकाळी वाधवा टॉवरमध्ये डीमार्टची गाडी आणली. रहीवाशांना घरपोच धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू मिळाल्याने रहीवाशांनी रवींद्र सावंत यांचे आभार मानले.
काही दिवसापूर्वी वाधवा टॉवरमध्ये डीमार्टची गाडी आली होती. वाधवातील रहीवाशी सोशल डिस्टनिंगचे पालन करत रांगा लावून उभे होते. यावेळी नेरूळ पोलिसांनी तिथे येत डीमार्टच्या कर्मचार्यांना मारहाण केली. वाधवा टॉवरमधील रहीवाशांना धान्याचा व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला. विनाकारण डीमार्टच्या कर्मचार्यांना मारहाण करणार्या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी रवींद्र सावंत यांनी पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा केला. या घटनेचे पडसाद मंत्रालयापर्यत उमटले.
डीमार्टच्या कर्मचार्यांना मारहाण झाल्याने कोणीही वाधवा टॉवरमध्ये धान्य घेवून गाडी आणण्यास तयार नव्हते. रहीवाशांची अडचण होवू लागली. करोडो रूपयांच्या सदनिका आणि धान्य मिळेना अशी अवस्था वाधवामधील रहीवाशांची झाली. वाधवाच्या रहीवाशांची होत असलेली कोंडी फोडण्यासाठी स्थानिक रहीवाशी असलेल्या नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी पुढाकार घेतला. डीमार्ट व्यवस्थापणाशी चर्चा केली.
रविवारी सकाळीच डीमार्टची गाडी पावणेदहाच्या सुमारास आली. रहीवाशांनी सोशल डिस्टनिंगचे पालन करत साहीत्य घेण्यास सुरूवात केली. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी, इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय स्तंभलेखक संदीप खांडगेपाटील उपस्थित होते. रहीवाशांनी व वाधवाच्या पदाधिकार्यांनी रवींद्र सावंत यांचे आभार मानले.