
नवी मुंबईतील लोकसंख्येच्या मानाने कोरोना रूग्ण तुरळक अहो. महापालिका प्रशासनाची आरोग्य यंत्रणा, आमदार, पालिका लोकप्रतिनिधी सतर्क असून जनजागृतीही व्यापक झालेली आहे. आजवर जे जे कोरोना रूग्ण सापडले आहेत, ते सर्व मुंबई, भिवंडी, ठाणे व अन्यत्र कामासाठी जाणारे आहेत अथवा त्या भागातून कामासाठी नवी मुंबईत येणारे आहेत. ग्रामीण भागात जिल्हाबंदी प्रभावीपणे राबविली जात आहे. नवी मुंबईतून मुंबई-ठाणे शहरात जाण्याचा मार्ग असला तरी बाहेरून येणारी वाहने नवी मुंबईत कोठेही थांबणार नाहीत याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. तसेच कोरोना असेपर्यत नवी मुंबईतून कामानिमित्त कोणी बाहेर जाणार नाही व बाहेरून कोणी नवी मुंबईत येणार नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने व राज्य सरकारने खबरदारी घेतल्यास नवी मुंबई शहर अल्पावधीतच कोरोनामुक्त शहर झालेले पहावयास मिळेल, असा आशावाद विजय घाटे यांनी व्यक्त केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे नवी मुंबई जिल्हा महामंत्री विजय घाटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस, ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांना ट्विट करत आपली कोरोनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.