नवी मुंबई : कोरोनामुळे रहीवाशी, मुले, महिला त्रस्त झाल्याने भाजपच्या प्रभाग ९६च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांच्या माध्यमातून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रभाग ९६ भाजपच्या वतीने ऑनलाईन चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना घरातच बसून स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्याचे गणेशदादा भगत यांनी सांगितले.
सध्या कोरोनाचा काळ आहे. लॉकडाऊनमुळे स्थानिक रहीवाशी घरात बसून निश्चितच कंटाळले असणार. पण आम्हाला रहीवाशांचा अभिमान आहे. स्थानिक रहीवाशी घरात राहून कोरोनाशी लढा देत आहात. आरोग्य विभागाला व पोलिसांना सहकार्य करत आहात. स्थानिक रहीवाशांचा विरंगुळा व्हावा आणि त्याच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याहेतूने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक -९६ च्या वतीने ऑनलाईन चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, गायन स्पर्धा आयोजित केली आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली कलाकृती ravindrabhagat81@gmail.com खालील ईमेल आयडीवर अथवा व्हॅाट्सऍप क्रमांकावर ३ मे २०२० पर्यत पाठवावी असे आवाहन गणेशदादा भगत यांनी केले आहे.
आपली कलाकृती पाठवताना सोबत सहभाग घेणाऱ्याचे पूर्ण नाव, त्यांच्या पालकाचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असावा. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी विकास तिकोने : ८४२४९९४८४९, सागर मोहिते : ८१६९६४१९४६, संजय गांडाल : ९१३७९८५५२२, रविंद्र भगत : ९५९४६५९००९ संपर्क साधावा, असे आवाहन गणेशदादा भगत यांनी केले आहे.
चित्रकला स्पर्धा सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी बक्षीस वयोगट ६ ते १० वर्ष वयोगट, ११ ते १५ वर्ष वयोगट, १५ ते २० वर्ष वयोगट आणि २० वयोगटावरील सर्व वयाचे ठेवण्यात आले आहेत. प्रथम क्रमांक : ११११/- सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांक : ७७७/- सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक : ५५५/- सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे.
गायन स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी वयाची अट नसून प्रथम क्रमांक : ११११/- सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक : ७७७/- सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक : ५५५/- सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना वयाची अट नसून प्रथम क्रमांक : ११११/- सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक : ७७७/- सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक : ५५५/- सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे.
टीप : ही स्पर्धा नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मधील नागरिकांकरिता आहे. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे लॉकडाऊन संपल्यावर सूचना देवून देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून त्यांना उत्साहीत करण्यात येईल. तर मग… मित्रांनो लागा कामाला, आम्ही वाट पाहतोय, तुमच्या व्हॅट्सऍप ईमेलची वाट पाहत असल्याचे आवाहन गणेशदादा भगत यांनी प्रभाग ९६ मधील जनतेला केले आहे.