अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
महापालिकेच्या उदासिनतेविषयी मनोज मेहेर यांनी केला संताप व्यक्त
नवी मुंबई : सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहा परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागला असताना नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी धुरीकरणास विलंब केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात जंतुनाशक फवारणी करण्यासाठी सारसोळे गावचे विकासपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज यशवंत मेहेर यांनी २७ मार्च रोजी महापालिका प्रशासनास लेखी निवेदन दिले होते. तथापि महापालिका प्रशासन सारसोळे गावात व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहीवाशांच्या आरोग्याप्रती गांभीर्य बाळगत नसल्याचा आरोप मनोज मेहेर यांनी केला आहे.
कोरोनाच्या सावटाखाली सारसोळे गावातील अंर्तगत व बाह्य भाग, नेरूळ सेक्टर सहामधील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात जावून , गावठाणातील घरासभोवताली जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी मनोज मेहेर यांनी करताना समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
परिसरातील रहीवाशी डासांच्या उद्रेकामुळे त्रस्त झाले आहेत. रहीवाशी विभाग कार्यालयात गेल्यावर त्यांना कुकशेत गावातील नागरी आरोग्य केंद्रात पाठविले जाते. डॉक्टर नाव लिहून घेतात. धुरीकरणाची बोंब कायम आहे. रहीवाशी ठेकेदाराकडेही धुरीकरणाबाबत पाठपुरावा करत आहेत. पालिका प्रशासनास जंतुनाशक फवारणी करायची नसेल आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांसह सारसोळेच्या ग्रामस्थांच्या जिवितला अडचणीतच आणायचे असेल तर त्यांनी आम्हाला लेखी परवानगी द्यावी असे मनोज मेहेर यांनी म्हटले आहे.
पालिका प्रशासनास जंतुनाशक फवारणीबाबत २४ दिवस उलटले तरी पालिका प्रशासन सारसोळे गावातील अंर्तगत भागात व ग्रामस्थांच्या घराबाहेरील परिसरात आणि नेरूळ सेक्टर सहामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात जंतुनाशक फवारणी न केल्याबाबत मनोज मेहेर यांनी संताप व्यक्त केला आहे.