अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर नोडमध्ये कोरोना काळात कधी गरजूंना धान्य दे तर कधी सोसायट्यांना भाज्या व फळे अत्यल्प दरात उपलब्ध करून दे असे जनहितैषी कार्यक्रम राबवित समाजसेवक विजय साळेंनी आपले कार्य कोरोना काळात अखंडपणे सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे पालिका निवडणूक लढविणे शक्य नसल्याचे माहिती असतानाही विजय साळेंनी आपल्या कार्यातून आपण पालिका निवडणूकीसाठी जनसेवा करत नसल्याचा संदेश आपल्या कृतीतून जुईनगरवासियांना दिला आहे.
सोमवार, दि. ४ मे रोजी विजय साळेंनी पुन्हा एकदा अत्यल्प दरात जुईनगरवासियांना भाज्या व फळे उपलब्ध करून दिली. गावंदेवी चौक व विना हॉटेलसमोर सकाळी ६.५० ते १०.३० या वेळेत स्थानिक रहीवाशांना विजय साळेंनी खरेदीसाठी आणलेल्या फळे व भाज्यांची विक्री झाली. या कालावधीत द्राक्षे ११०० किलो, कलिंगड ३०० नग,
खरबूज २०० नग, गाजर २०० किलो, काकडी गावठी १५० किलो, वांगी २०० किलो, साधी काकडी १५० किलो,
ढोबळी मिरची ३०० किलो, गाजर १५० किलो, दोडका १०० किलो, कारली १५० किलो, भेंडी ३०० किलो, कोबी ६०० नग, फ्लॉवर ६०० नग, कोथिंबीर १०० जुडी, दुधी ४०० नग, लवंगी मिरची १०० किलो, शेवगा ५०० नग, टॉमटो ५०० किलो, मेथी १०० जुडी, कांदा १०० किलो, बटाटा १०० किलो, शापू १०० जुडी, पालक १५० जुडीची विक्री झाली.
विजय साळेंमुळे कोरोना काळात घराजवळच स्वस्त दरात भाज्या व फळे मिळणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया जुईनगरवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.