• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2020

केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण : प्रकाश आंबेडकर

adminbyadmin
in Uncategorized
0
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण : प्रकाश आंबेडकर

अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com 

पुणे :- लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना त्यांच्या गावी नेण्यासाठी रेल्वे आणि एसटीची (राज्य ट्रान्सपोर्ट)  सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र मजुरांकडून तिकिटापोटी भाडे आकारण्यात येत असल्याने केंद्र आणि राज्य सरकार मजुरांमध्ये भेदभाव करीत आहे, त्यांचे शोषण करीत आहे. परदेशात अडकलेल्या भारतीय कामगारांना भाडे न आकारता त्यांना विमानाने भारतात आणण्यात आले. मात्र देशातील मजुरांकडून भाडे घेतली जात आहे. हा भेदभाव नाही का ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

गेल्या दीड महिन्यापासून लाखो रोजंदारी कामगार राज्यात अडकून पडले आहेत. काम बंद झाल्याने त्यांच्याकडे उपजीविकेसाठी पैसे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून तीन दिवसांसाठी रेल्वेसेवा सुरू करून या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली. मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या मजुरांकडून प्रवासासाठी भाडे आकारण्यात येत असल्याने अनेक मजुर अडचणीत आले आहेत. पैसे नसल्याने, पोटाला अन्न नाही, उपाशीपोटी दिवस काढणारे हे मजूर रेल्वे तिकीटासाठी पैसे कुठून आणणार, केंद्र आणि राज्य सरकार हा भेदभाव करीत आहे. विदेशातील भारतीयांना भाडे न आकारता भारतात आणण्यात आले. मग देशातील मजुरांकडून रेल्वे, एसटी प्रवासासाठी भाडे का आकारत आहेत असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कामगारांकडून भाडे न आकारता त्यांना त्यांच्या गावी सोडावे, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Previous Post

वृक्षछाटणीसह नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीची नगरसेविका रूपाली भगत यांची मागणी

Next Post

कोरोनाचे सामाजिक भान जपणारा प्रसिध्दी विभागातील योध्दा प्रफुल्ल!

Next Post
कोरोनाचे सामाजिक भान जपणारा प्रसिध्दी विभागातील योध्दा प्रफुल्ल!

कोरोनाचे सामाजिक भान जपणारा प्रसिध्दी विभागातील योध्दा प्रफुल्ल!

हजारोंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का? : आशिष शेलार

चाकरमान्यांना त्यांच्या मुळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था करा : आशिष शेलार

कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा  निर्णय योग्य

मजुरांचा प्रवासखर्च न करता काँग्रेसने मजुरांना अन्नधान्य द्यावे : रामदास आठवले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com