नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या उद्रेकाला प्रतिबंध करण्यासाठी व रहीवाशांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जनसेवक गणेशदादा भगत व भाजप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांच्या माध्यमातून रहीवाशांच्या आग्रहास्तवच आर्सेनिक अल्बम ३०चे नेरूळ पश्चिमेला वितरण करण्यात येत आहे.
प्रभाग ९६ मध्ये गरजूंना धान्य वाटप, त्यानंतर रस्त्यावर तसेच सोसायटी आवारात सातत्याने जंतुनाशक फवारणी झाल्यावर परिसराच्या स्वच्छतेसोबत रहीवाशांच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जनसेवक गणेशदादा भगत व भाजप नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी प्रभागात आर्सेनिक अल्बम ३० चे वितरणचे घरटी वितरण करण्यास सुरूवात केली. या गोळ्यांच्या वितरणासाठी स्थानिक रहीवाशांकडून गणेशदादा भगत यांच्याकडे मागणीचा रेटाही लावला जात होता. स्थानिक रहीवाशांच्या मागणीस्तव जनसेवक गणेशदादा भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभाग ९६ घरटी पिंजून काढताना ३००० गोळ्यांच्या पाकिटांचे वितरण केले.
प्रभाग ९७ मध्येही जनसेवक गणेशदादा भगत यांचा गेल्या दहा-बारा वर्षापासून दांडगा जनसंपर्क असल्याने तेथील लोकांनीही आर्सेनिक अल्बम ३० वितरणासाठी गणेशदादा भगत यांना साकडे घातले. त्या ठिकाणीही गणेशदादा भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी १५०० गोळ्यांच्या पाकिटाचे वितरण केले. हा माझा प्रभाग, तो माझा नाही ही राजकीय भावना बाजूला ठेवून कोरोना काळात नेरूळकर जगला पाहिजे. कोरोनाशी लढताना त्याच्यात रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे या एकमेव सामाजिक भावनेतून आपण गोळ्यांच्या पाकिटांचे वितरण करत असल्याची माहिती जनसेवक गणेशदादा भगत यांनी दिली.