
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ या अभियानांर्तगत लोकनेते आ. गणेश नाईक साहेब व आ. सौ मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सानपाडा प्रभाग ७६ स्थानिक भाजपा कार्यकर्ते व समाजसेवक पांडूरंग आमले यांनी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांना फूट स्टेप सॅनिटायझर स्टॅन्डचे मोफत वाटप केले. यावेळी भाजपचे जिल्हा महासचिव विजय घाटे उपस्थित होते.
कोरोना काळात आ. गणेश नाईक व आ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ७५ मध्ये भाजपा कार्यकर्ते पांडूरंग आमले यांनी यापूर्वी नऊ विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. प्रभाग ७६ मध्ये फूट स्टेप सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप हा दहावा उपक्रम पांडूरंग आमले यांनी फूट स्टेप सॅनिटायझर स्टॅन्डचे मोफत वाटप करून राबविला आहे.
प्रभाग क्रमांक ७६ मधील आदर्श, संकल्प, कोहिनूर, सिद्धिविनायक, नवरत्न, स्नेहबंधन, हिमगिरी, निवारा, गुरुकृपा व सुयोग समूह या सोसायटीत पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून फूट स्टेप सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप करण्यात आले या स्टॅन्डचे वाटप शुभारंभ जिल्हा महामंत्री विजय घाटे साहेब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आबा जगताप मंडळातील रमेश शेटे, आज्ञा गव्हाणे, गणेश कमळे, नीता आंग्रे, राजश्री कमळे, सुरेश पडवळ, विश्वास कणसे तसेच सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आपासाहेब घेवंदे, नाईक , इंदोरे , सिंग, गावडे , गोळे आणि अनिल डोळस, मछिंद्र शेळके, संजय मुळीक व पदाधिकारी उपस्थित होते.