
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाकडून रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या’चे नेरूळ-जुईनगर नोडमधील प्रभाग ८४ मध्ये वाटप करण्यात आले.
नेरूळ सेक्टर २,४ मधील घरकुल असोशियन, वारणा कॉलनी, जयहिंद, आम्रपाली, सविनय या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये, एलआयजीमधील बैठ्या चाळीतील रहीवाशांना तसेच जुईनगरमधील काही परिसरात घरटी जावून या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. गोळ्या वाटण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वीही कॉंग्रेसकडून या परिसरात गोळ्याचे वाटप केले होते. कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिव विद्या भांडेकर, सहसचिव शेवंता मोरे व महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून गोळ्यांचे वाटप केले. तसेच कोरोनाबाबत जनजागृती व घ्यावयाची उपाययोजना याची माहिती व मार्गदर्शनही कॉंग्रेसकडून यावेळी कऱण्यात आले.