भास्कर गायकवाड :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्याने खाडीलगत असलेल्या प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात डासांचा उद्रेक वाढू लागल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होण्यापूर्वीच प्रभागातील सर्वात जुने भाजप कार्यकर्ते असलेल्या मनोज यशवंत मेहेर यांनी सारसोळे गावात व नेरूळ सेक्टर सहा परिसरात मोफत धुरीकरण अभियान सुरू केले आहे.
महापालिका प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात २२ जुनपासून मनोज यशवंत मेहेर यांनी भाजपच्या माध्यमातून लोकल्याणकारी अभियानाचा शुभारंभ केला असून प्रभागात धुरीकरणाचे आजवर चार टप्पेही पार पाडले आहेत. २२ जून रोजी सारसोळे गावातील प्रवेशद्वार असलेल्या कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील दोन्ही बाजूच्या सर्व गृहनिर्माण सोसायट्या व सारसोळे गावातील काही भागात पहिल्या टप्याअंर्तगत धुरीकरण केले. २३ जून रोजी धुरीकरणाच्या दुसऱ्या टप्यात सारसोळे गावातील वेशीपर्यत धुरीकरण करण्यात आले. २५ जून रोजी धुरीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सिडकोची नेरूळ सिव्ह्यू सोसायटी, हिमालय सोसायटी, विक्रम बारपासून ते दर्शन दरबारपर्यतच्या सर्व गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्यात आले. २६ जून रोजी धुरीकरणाच्या चौथ्या टप्यात समाजमंदीर शिवगंगा सोसायटी ते मच्छिमार्केटपर्यतच्या सर्व गृहनिर्माण सोसायटी आवारात धुरीकरण करण्यात आले.
सारसोळे गावातील ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागू नये म्हणून भाजपच्या वतीने हा मोफत धुरीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून तो कायमस्वरूपी राहणार असल्याचे माहिती मोफत धुरीकरण कार्यक्रमाचे आयोजक व भाजप कार्यकर्ते मनोज यशवंत मेहेर यांनी दिली.