नवी मुंबई : थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबसह क ोरोना टेस्ट लॅब नवी मुंबई शहरात सुरू करून एमआरआय सुविधा उपलव्ध करण्याची शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई या सधन महानगरपालिकेकडे थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबही उपलब्ध नाही. चाचणीसाठी काढलेले रक्त तपासणीची यंत्रणाही आपल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. केंद्र व राज्य सरकारकडून सतत पुरस्कार मिळविणार्या महापालिका प्रशासनाकडे स्वत:ची या आजारावर लॅब नसणे ही शोकांतिका आहे. पालिका स्थापनेनंतर 28 वर्षानंतर आपण करदात्या नवी मुंबईकरांना एमआरआय सुविधा उपलब्ध करून देत नसलो तर केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार्या पुरस्कारांना नागरिकांच्या लेखी काडीमात्र किंमत नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत. साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे. डेंग्यू,स्वाईन फ्ल्यूचा उद्रेक झाल्यास त्याची फार मोठी किंमत मोजावी लागण्याची भीती नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांची कोरोनाबाबत चाचणी केली तरी त्याचे चाचणी अहवाल येण्यास दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर चांगले, परंतु पॉझिटिव्ह अहवाल आला तर तात्काळ हालचाली करून उपचारासाठी यंत्रणा सतर्क होते. पंरतु यादरम्यान संबंधित पॉझिटिव्ह रूग्ण शेकडो लोकांच्या संपर्कात आलेला असतो. नवी मुंबईसारख्या सधन महापालिकेत कोरोना टेस्ट लॅब स्वखर्चाने उभी करणे अशक्य नाही. कोरोना रूग्णांची वाढती आकडेवारी नवी मुंबईसारख्या प्रगत शहराला भूषणावह बाब नाही. करदात्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. करदात्या नागरिकांकडून कर गोळा करून अडीच हजार कोटीच्या ठेवी वाढविण्यात धन्यता मानणे चुकीचे आहे. आता नवी मुंबईकरांचे प्राण वाचविणे महत्वाचे आहे. नवी मुंबईकर कोरोनाच्या संकटातून सुटला तर आपणास अडीच हजार नाही तर पाच हजार कोटीच्या ठेवी वाढविता येतील; लवकरात लवकर महापालिकेने नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना टेस्ट लॅब लवकरात लवकर सुरू करून नवी मुंबईकरांना ती मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.
नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणाला प्राधान्य देणे आता आवश्यक आहे. नवी मुंबई शहरात थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबसह क ोरोना टेस्ट लॅब लवकरात लवकर सुरू करून एमआरआय सुविधा उपलव्ध करणे आता काळाची गरज आहे. आपली महापालिका सधन म्हणून राज्यात ओळखली जात आहे. आपण आरोग्याबाबत नवी मुंबईकरांना सुविधा देण्यास सक्षम नसलो तर त्या पुरस्कारांना व अडीच हजार कोटीच्या ठेवींना काहीही अर्थ नाही. समस्येचे गांभीर्य जाणून लवकरात लवकर नवी मुंबई शहरात थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबसह क ोरोना टेस्ट लॅब लवकरात लवकर सुरू करून एमआरआय सुविधा उपलव्ध करून देण्याची कार्यवाही करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.