• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 18, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 9, 2020

‘जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा’

adminbyadmin
in Uncategorized
0
खोटे बोलणाऱ्या राजेश टोपेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : गजानन काळे

सुवर्णा खांडगेपाटील

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कोरोनाबाधीत रूग्णांना देण्याचा निर्णय घ्या

नवी मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब आणि असहाय्य जनतेस अनेक आजारांवर पुरेशी शासकीय मदत मिळवुन देणारी एक उत्तम योजना आहे. मात्र हीच योजना कोरोनाबाधीत रूग्णांसाठी कुचकामी ठरत आहे. या योजनेतील अटीनुसार जर कोरोनाबाधीत रूग्ण व्हेंटीलेटरवर असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र सरकारी आकडेवारीचा अभ्यास करता एकुण रूग्णांपैकी १/२ टक्का रूग्णांनाही व्हेंटीलेटरची आवश्यकता भासत नाही.याचाच अर्थ ही योजना महाराष्ट्रातील एकुण कोरोनाबाधीत रूग्णांच्या १ टक्का रूग्णांनाही फायद्याची ठरत नाही.त्यातच शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक किंवा दोनच खाजगी रूग्णालये या योजनेखाली आणल्याने ग्रामीण भागातील जनता तर कोरोना आजारासंदर्भात या योजनेचा अजिबातच लाभ उठवु शकत नसल्याचे नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी निवेदनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून महाराष्ट्रातील १ लाख २२ हजार रुग्णाना मोफत उपचार दिल्याचा दावा आपले राज्याचे आरोग्य मंत्री व मंत्री मंडळातील सहकारी राजेश टोपे यांनी केला आहे. मुळातच आपल्याला कल्पना असेल व आपण माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही कोरोनाबाधीत रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच त्या रुग्णाला लागू पडते किंवा त्याला मोफत उपचार मिळतात याचे शेकडो अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आले आहेत. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या निर्णयामध्ये देखील याचा उल्लेख आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा हेल्पलाईन नंबर आणि टोल फ्री नंबर १५५३८८ या वर कॉल केल्यावर हीच माहिती दिली जाते. (ती ऑडिओ क्लिप ही आम्ही आपल्याला या पत्रासोबत पाठवली आहे ती आपण जरूर ऐका)हे असताना ही आरोग्यमंत्री असा दावा कसा करू शकतात हा भाबडा प्रश्न आम्हाला पडला आहे. मुळातच आपणच माहिती देता त्या प्रमाणे व्हेंटिलेटरवर कोरोना रुग्ण आहेत त्यांची टक्केवारी ही अर्धा ते १ टक्का आहे मग आपले आरोग्यमंत्री सांगत होते. त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख ७० हजार कोरोनाबाधीत रुग्ण असताना १ लाख २२ हजार कोरोनाबाधीत रूग्णांना मोफत उपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कसे मिळाले की इतके रुग्ण व्हेंटिलेटर वर होते, असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री महोदय आपण अतिशय सुसंस्कृत म्हणुन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात. या पत्राद्वारे आम्ही आपणाकडे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोविडबाधीत रूग्णांसाठी असलेली व्हेंटीलेटरची अट काढून टाकुन आणि राज्यातील सर्व कोविड उपचार करणारी खाजगी रूग्णालये या योजनेखाली आणून ही योजना अधिक व्यापक व जनहितार्थ करावी अशी विनंती करत आहोत. आपण नक्कीच या विनंतीवर सकारात्मक अंमलबजावणी कराल असा विश्वास गजानन काळे यांनी निवेदनाच्या अखेरीस व्यक्त केला आहे.

आपण रूसल्यामुळे घाबरून राष्ट्रवादीला आपले ५ नगरसेवक परत आपल्याकडे पाठवावे लागले. तसेच पुन्हा एकदा जनतेच्या भल्यासाठी रूसा. रूसण्यात फार दम असतो. समोरच्याचा दम निघतो. आपणही पुन्हा एकदा जनतेसाठी रूसुन आरोग्यमंत्र्यांकडून योजनेसाठी असलेली व्हेंटीलेटरची अट रद्द करून घ्या, आरोग्यमंत्र्यांकडून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थींची खरी यादी मागवुन घ्या,जनतेशी आरोग्यमंत्री सतत खोट बोलतात म्हणुन त्यांचा राजीनामा घ्या. जनतेचा दम निघतोय. आतातरी मंत्र्यांना दमात घ्या असे आवाहन गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Previous Post

पोलिसांशी हुज्जत, पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू

Next Post

उर्जा विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार देणार : डॉ. नितीन राऊत

Next Post
उर्जा विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार देणार : डॉ. नितीन राऊत

उर्जा विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार देणार : डॉ. नितीन राऊत

गणेश भगतांच्या पाठपुराव्यामुळे काही तासातच बसथांब्याची दुरूस्ती

गणेश भगतांच्या पाठपुराव्यामुळे काही तासातच बसथांब्याची दुरूस्ती

घरवापसी केलेल्या नगरसेवकांकडून माजी आमदाराच्या हकालपट्टीची मागणी

घरवापसी केलेल्या नगरसेवकांकडून माजी आमदाराच्या हकालपट्टीची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com