दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, एलआयजी वसाहतीतील वारणामधील पडझड झालेल्या वृक्षाच्या पडलेल्या फांद्या व इतर पालापाचोळा तात्काळ उचलण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजी वसाहतीमधील वारणा सोसायटीत एक मोठे झाड घरावर पडले होते. या पडलेल्या झाडाच्या फांद्या, बुंधे व उर्वरित पडलेले झाड आजही आहे त्याच ठिकाणी आहे. पालिका प्रशासनाकडून पडझड झालेले झाड, फांद्या, बुंधे उचलण्यास पालिका प्रशासनाकडून अजूनही कार्यवाही न झाल्याने स्थानिक रहीवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. झाडाच्या फांद्या व इतर कचरा, पालापाचोळा उचलला न गेल्याने डासांचा त्रास वाढला असल्याची स्थानिक रहीवाशांकडून तक्रार करण्यात येत आहे. हा झाडाचा पालापाचोळा, फांद्या व अन्य कचरा पालिका प्रशासनाने तात्काळ हटवावा, अशी मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.