नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून नेरूळमधील आगरी-कोळी भवनात कोरोगाग्रस्तांवर उपचार केले जात आहे. अभिजित बांगर यांनी महापालिका आयुक्त म्हणून कालच पदभार स्विकारला आहे. त्यांनी तेथील समस्या व असुविधा जाणून घेण्यासाठी आगरी-कोळी भवन येथे सर्वप्रथम पाहणी अभियान राबवावे, अशी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २४ मध्ये आगरी-कोळी भवन आहे. या भवनात महापालिका प्रशासनाकडून कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या या भवनातील तळमजल्यावर जवळपास ६० रूग्णांवर उपचार केले जात आहेत. आपण कालच आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला आहे. आपण सर्वप्रथम या भवनाची व तेथील कोरोना रूग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी करावी. येथील शौचालयाची दुरावस्था झाली असून सर्वत्र लाल लाल पहावयास मिळत आहे. वॉश बेसिन लिंकेज असून पाणी तेथे वाहताना दिसत आहे. त्याची तात्काळ डागडूजी होवून शौचालय स्वच्छतेलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. भवनात सॅनिटायझर स्टॅण्ड एकच असून ते प्रवेशद्वारावर ठेवण्यात आले आहे. वास्तविक सॅनिटायझर स्टॅण्ड अजून एक-दोन वाढविणे आवश्यक असून शौचालयात जाताना व बाहेर आल्यावर कोरोना रूग्ण सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करून घेतील. आपण शक्य तितक्या लवकर या भवनात पाहणी अभियान राबवून तेथील असुविधा दूर कराव्यात अशी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.