सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८४ मधील नेरूळ सेक्टर २ मधील रहीवाशी मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले होते. या भटक्या कुंत्र्यांबाबत भारतीय जनता युवा महिला मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी केवळ महापालिकेकडे तक्रार करून समादान मानले नाही तर पालिका कर्मचाऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरून संबंधित कर्मचाऱ्यांना मदत केल्याचे स्थानिक रहीवाशांनी जवळून पाहिले.
भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नेरुळ सेक्टर २ येथील रहीवाशी त्रस्त झाले हेाते. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनचालकांच्या अंगावर धावून जाणे, सतत भुकंणे, चावा घेणे अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. त्यातच लॉकडाऊनमुळे या मोकाट व भटक्या कुत्र्यांना कचराकुंडी व इतरत्र अन्न न भेटल्याने सामान घेवून जाणाऱ्या रहीवाशांच्या विशेषत: महिलांच्या सामानावर कुत्र्यांनी हल्ला करण्याच्याही काही घटना घडल्या. ही समस्या सोडविण्यासाठी सुहासिनी नायडू यांनी पालिका प्रशासनाला तक्रार केली. या तक्रारीत त्यांनी नेरुळ सेक्टर २ बळीराम जोशी मार्ग, राजीव गांधी उड्डाणपुलाखाली व सेक्टर ४ येथील मार्गांवर भटक्या श्वानांमुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिले.
पालिकेच्या श्वान पथकाकडून तातडीने सुहासिनी नायडू यांची तक्रार प्राप्त होताच मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून नेण्यात आले. या कामी नायडू स्वत: रस्त्यावर उतरून पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना मदत करत होत्या.