नवी मुंबई : कोरोना काळ सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील गरीब वर्गासाठी तसेच श्रमिकांच्या वस्तीसाठी एमआयएम विद्यार्थी संघटनेकडून कोकण विभाग निरीक्षक हाजी शाहनवाझ खान यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध जनकल्याणकारी कामाचा सुरू झालेला धडाका आजही कायम आहे. शुक्रवारी (दि. २४ जुलै) तुर्भेतील गरीब व गरजू लोकांना एमआयएम विद्यार्थी संघटनेकडून १५०० लीटर दूधाचे वाटप करण्यात आले.
हाजी शाहनवाझ खान हे एमआयएमच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक उपक्रमात व्यस्त असलेले नेतृत्व आहे. एमआयएमच्या व्यासपिठावरून वंचित, गरीब, गरजू यांच्या उच्चसुशिक्षितांना ते एकत्र आणत संघटना बांधणीचे कार्य प्रभावीपणे करत आहेत. आजच्या रायगडच्या राजकारणात हाजी शाहनवाझ खान चमकत असले तरी नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात आजही हाजी शाहनवाझ खान यांची पाळेमुळे विस्तारलेली आहे. त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याचा श्रीगणेशा त्यांची नवी मुंबईच्या मातीतून केला होता, हे आजही शाहनवाझ खान विसरलेले नाहीत. नवी मुंबईच्या मातीचे आपल्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठीच कोरोना काळात लॉकडाऊन पर्वातही हाजी शाहनवाझ खान एमआयएम विद्यार्थी संघटनेच्या व्यासपिठावरून नवी मुंबईतील गरीब व गरजूंना सातत्याने मदत करताना पहावयास मिळत आहे. आजही तुर्भे परिसरातील गरीबांना हाजी शाहनवाझ खान यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम विद्यार्थी संघटनेच्या इस्लाम शेख, आशिक अली, मोहसीन शेख या पदाधिकाऱ्यांनी १५०० लीटर दूधाचे मोफत वाटप केले. या शहरातून कोरोनाचे पूर्णपणे र्निमूलन होत नाही, तोपर्यत एमआयएमची विद्यार्थी संघटना नवी मुंबईतील गरीबांना व गरजूंना मदत करण्यात सक्रिय योगदान देण्यात पुढाकारच घेताना दिसेल, असे हाजी शाहनवाझ खान यांनी सांगितले.