• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, February 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 27, 2020

अनधिकृत मार्केट उभारणीचा खर्च संबंधित दोषी महापालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करा

adminbyadmin
in Uncategorized
0
अनधिकृत मार्केट उभारणीचा खर्च संबंधित दोषी महापालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करा

पत्रकार संदीप खांडगेपाटील यांची मुख्यमंत्री, महापालिका आयुक्तांसह शहर अभियंत्यांकडे मागणी

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर सहामध्ये सिडकोच्या जागेवर मार्केटसाठी आरक्षित भुखंडावर महापालिकेने भुखंड हस्तांतरीत होण्यापूर्वीच मार्केट बांधले. हे मार्केट नंतर तोडण्यात आले. या मार्केटच्या उभारणीसाठी खर्च झालेला २२ ते २५ लाख रूपयांचा निधी सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांचा असल्याने तो संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर अनधिकृतरित्या मार्केट बांधले. हा भुखंड महापालिकेकडे हस्तांतरीत न झाल्याने सिडकोने ते अतिक्रमण जाहिर करत मार्केटवर कारवाई करत ते मार्केट पाडून जमिनदोस्त केले. याप्रकरणी महापालिकेचा २२ ते २५ लाख रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. हा जाणिवपूर्वक पाण्यात गेलेला निधी हा करदात्या नवी मुंबईकरांच्या घामाचा पैसा आहे. याप्रकरणी मार्केट मंजूर करणारे, महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात व महासभेत मंजुरीला प्रस्ताव पाठविणारे तसेच मार्केटसाठी ठेकेदाराला देयक मंजुर करणारे शहर अभियंत्यापासून जे जे महापालिका अधिकारी जबाबदार आहेत, त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून महापालिकेचा वाया गेलेला निधी त्यांच्या वेतनातून, वेळ पडल्यास पीएफमधील पैसा काढून व्याजासकट वसूल करावा. यातील दोषी कोणी अधिकारी सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांच्या संपत्तीचा लिलाव करून हा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा करावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडकोच्या जागेवर महापालिकेने बांधलेले मार्केट तोडण्याची नामुष्की महापालिकेवर आली. करदात्या नवी मुंबईकरांचे सुमारे २२ ते २५ लाख पाण्यात गेले. त्यामुळे याप्रकरणी दोषी असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटसाठी पाण्यात गेलेला लाखो रूपये खर्च संबंधितांकडून वसूल होणे आवश्यक आहे. नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिका प्रशासनाने सिडकोने मार्केटसाठी आरक्षित ठेवलेल्या भुखंडावर मार्केट बांधले. या मार्केटकरिता महापालिका प्रशासनाचे अंदाजे २२ ते २५ लाख रूपये खर्च झाले आहेत. मार्केटसाठी आरक्षित असलेल्या भुखंडाचे सिडकोकडून महापालिकेकडून हस्तांतर होणेपूर्वीच मार्केट बांधल्याने हे मार्केट अनधिकृत ठरले व या अनधिकृत मार्केटवर स्वत:च हातोडा चालविण्याची व मार्केट पाडण्याची नामुष्की शुक्रवार, दि. ८ जून २०१८ रोजी प्रथमच महापालिका प्रशासनावर आली. या अनागोंदी कारभारामुळे महापालिका प्रशासनाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांचा आहे. सिडकोकडून भुखंड हस्तांतरीत न होताच त्यावर मार्केट का बांधण्यात आले व त्या जागेवर २२ ते २५ लाख रूपये महापालिका प्रशासनाचे खर्च झाले. ते मार्केट अनधिकृत ठरले व महापालिकेला ते मार्केट पाडावे लागले. महापालिकेच्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेवून कार्यवाही केली, त्या सर्व अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करून मार्केटवर झालेला खर्च संबंधितांकडून लवकरात लवकर वसूल करण्यात यावा यासाठी आपण  महापालिका प्रशासनाला आदेश द्यावेत आणि याबाबत महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली याचा लेखी अहवाल आम्हास प्राप्त करून द्यावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

सारसोळे गावातील मच्छि मार्केटची पाहणी करण्याकरिता पाहणी अभियान राबवा : मनोज मेहेर

Next Post

प्रभाग ९६ मधील कोव्हिड १९ पार्श्वभूमीवर आयुक्तांसोबत गणेश भगतांची सदिच्छा भेट

Next Post
प्रभाग ९६ मधील कोव्हिड १९ पार्श्वभूमीवर आयुक्तांसोबत गणेश भगतांची सदिच्छा भेट

प्रभाग ९६ मधील कोव्हिड १९ पार्श्वभूमीवर आयुक्तांसोबत गणेश भगतांची सदिच्छा भेट

आगामी दोन महिने शिधापत्रिका नसलेल्यांना आधारकार्डधारकांना शिधा वाटप दुकानातून मोफत धान्य देण्याची मागणी

आगामी दोन महिने शिधापत्रिका नसलेल्यांना आधारकार्डधारकांना शिधा वाटप दुकानातून मोफत धान्य देण्याची मागणी

आर टी ई प्रक्रिया सन २०२०-२१ अंमलबजावणीसाठी भाजपचे आयुक्तांना साकडे

आर टी ई प्रक्रिया सन २०२०-२१ अंमलबजावणीसाठी भाजपचे आयुक्तांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com