राजेंद्र पाटील
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी उघड्या गटारांवरील सिमेंट ची झाकणे ही नसल्यामुळे तसेच विविध भागात गटारे तुंबल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव या उघड्या गटारावर जाणवु लागल्याने अनेक भागात डेंग्यु, मलेरीया तसेच व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला आदी विविध रोगाचा शिरकाव सध्या पनवेल शहरात दिवसेंदिवस वाढीस लागला आहे.
पनवेल शहरातील बागवान मोहल्ला,पटेल मोहल्ला, कोळीवाडा, मच्छी मार्केट परीसर धोबी आळी,मिरची गल्ली बाजारपेठेत आदी परीसरात गटांरांवरील झाकणांची अवस्था अंत्यत दयनीय झालेली आहे. कित्येक भागात तर आजही मोठ मोठी गटारे सताड उघड्या अवस्थेत आहेत स्थानीक रहिवाशांनी महापालिकेकडे उघड्या गटारांवर झाकणे टाकण्यास तक्रारी केल्या परंतु महापालीकेकडुन मोठ्या साईजची झाकणे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येऊन सर्व सामान्य नागरीकांना टोलविण्यात येते.पनवेल कोळीवाडा येथील मच्छी मार्केट परीसरात तर अनेक गटारांवर झाकणे तुटलेल्या अवस्थेत निदर्शनास येतात. मिरची गल्ली येथील लोहाणा महाजन वाडी लग्नाच्या हॉल समोरील एक मोठ्या गटारांबाबात अनेक वेळा येथील स्थानिकांनी उघड्या गटारावर झाकणे बसविण्याकरीता महापालिकेकडे तक्रार केली आहे. येथील जागृत नागरीकांनी तर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांच्या वॉटसप नंबर वर देखील संबधीत या परीसरातील उघड्या गटाराचे फोटो देखील पाठविले होते. परंतु आजमितीला देखील तेथील उघडी गटारे जैसे थे आहेत उघड्या गटारांमुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व सामान्य करदाते नागरीक हैराण झाले आहेत. काही ठिकाणी गटारे ही मोठ्या साईजची असल्याने झाकणांची साईज ही कमी पडते. त्यामुळे त्या ठिकाणी पालिकेकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना न करताच सदर गटारे सताड उघडे ठेवण्यात येतात. वास्तविक पाहता गटारांची वाढलेली साईज व त्यावर योग्य बसणार्या झाकणांची व्यवस्था ही पालिकेने करणे गरजेचे असून देखील त्याकडे महापालिका कानाडोळा करीत असल्याने या गटारांवर मच्छरांचा प्रादुर्भाव तसेच प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा खच काही प्रमाणात असल्याने सदर ठिकाणी दुर्गंधी युक्त वासाचा नागरिकांना त्रास होत आहे. पालिकेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून पनवेल शहरातील बहुतांश उघड्या गटारांवर झाकणांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी पनवेलकर करदाते नागरिक करीत आहेत.