सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक रहीवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मा. नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत आणि जनसेवक गणेशदादा भगत यांच्या माध्यमातून अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
बुधवार, दि. २९ जुलै रोजी प्रभाग ९६ मधील गंगोत्री सोसायटी, शिवशक्ती सोसायटी, बालाजी सोसायटी, अजिंक्यतारा सोसायटी, जय भवानी सोसायटी, मंगलमूर्ती सोसायटी, शिवनेरी सोसायटी, शिवप्रसाद सोसायटी, शिव सागर सोसायटी, साई प्रेरणा सोसायटी, सह्याद्री सोसायटीमध्ये जावून जनसेवक गणेश भगत यांनी रहीवाशांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप केले. हा तिसरा टप्पा असल्याची माहिती गणेश भगत यांनी दिली. सदर कामी सागर मोहिते,विकास तिकोने,अशोक गांडाल,राजेंद्र तुरे यांनी विशेष सहकार्य केले.