• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 20, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 5, 2020

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावले!: अशोक चव्हाण

adminbyadmin
in Uncategorized
0
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे एक अनुभवी मार्गदर्शक, नेतृत्व गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाल्याची बातमी वाचली तेव्हा अतिशय आनंद झाला होता. खंबीर, दृढनिश्चयी असलेले निलंगेकर साहेब पु्न्हा लवकरच घरी परततील, अशी अपेक्षा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक प्रदीर्घ पर्व संपुष्टात आले.

विद्यार्थी दशेतच त्यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्रामात उडी घेतली होती. स्वातंत्र्याचा हा लढा संपल्यानंतर त्यांनी स्वतःला लोकसेवेसाठी वाहून घेतले. एक आमदार ते मुख्यमंत्री या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी नेहमी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. विशेषतः सिंचन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. शिक्षण संस्था उभ्या करून लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची गंगा आणली.

अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर व चारित्र्यसंपन्न नेते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता. गावागावातील कार्यकर्त्यांना ते अगदी नावानिशी ओळखायचे. नव्वदीत असतानाही ते अनेकदा काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या बैठकींना हजर रहायचे. आम्हाला मार्गदर्शन करायचे. पुढील काळात त्यांची उणीव आम्हाला नक्कीच जाणवत राहिल, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

Previous Post

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने राजकारणातील सज्जन माणूस हरपलाः मल्लिकार्जुन खर्गे

Next Post

नेरूळ सेक्टर २ मधील रहीवाशांच्या दारी आले एमएसईडीसीचे अधिकारी

Next Post
नेरूळ सेक्टर २ मधील रहीवाशांच्या दारी आले एमएसईडीसीचे अधिकारी

नेरूळ सेक्टर २ मधील रहीवाशांच्या दारी आले एमएसईडीसीचे अधिकारी

संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने नवी मुंबईत प्रथमच कोरोना योद्धांना हेल्थ पॉलिसी वितरण

संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने नवी मुंबईत प्रथमच कोरोना योद्धांना हेल्थ पॉलिसी वितरण

मुसळधार पावसामुळे झालेल्या वृक्ष पडझडीच्या पाहणीसाठी पालिका आयुक्तांना भाजपच्या गणेश भगतांचे निमत्रंण

मुसळधार पावसामुळे झालेल्या वृक्ष पडझडीच्या पाहणीसाठी पालिका आयुक्तांना भाजपच्या गणेश भगतांचे निमत्रंण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com